संकट कितीही गंभीर असले तरी पोलिस प्रशासन मात्र खंबीर असते, असे म्हणतात ते उगीच नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला मिळाला आहे.
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन (Police administration) अहोरात्र प्रयत्न करत असते. गेल्या वर्षभरापासून राज्यावर आलेल्या कोरोना (Covid-19) महामारीत देखील जिवाची पर्वा न करता पोलिस नागरिकांच्या आरोग्याच्या खबरदारीसाठी सर्वपरीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जनसामान्यात पोलिसांबद्दल एक आपुलकीची भावना अधिक दृढ होऊ लागली आहे. तसेच राज्यावर आलेल्या विविध नैसर्गिक व आर्थिक संकटांच्या वेळीही पोलिस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत वेळोवेळी आपल्या पगारातून मदत केलेली आहे. त्यामुळे संकट कितीही गंभीर असले तरी पोलिस प्रशासन मात्र खंबीर असते, असे म्हणतात ते उगीच नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस अंमलदार गणेश शिंदे (Ganesh Shinde) यांनी पूरग्रस्त भागातील (Flood) बांधवांसाठी एक महिन्याचा पगार दिला आहे. (A police has donated a month's salary to help flood victims-ssd73)
सध्या रायगड (Raigad), चिपळूण (Chiplun), सिंधुदुर्ग (Sindhudurg), त्याचबरोबर कोल्हापूर (Kolhapur) व अन्य इतर भागांत अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्याने, संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याने तेथील स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आणि कुटुंबे उघड्यावर आली आहेत. तर कित्येक जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. पूरग्रस्त नागरिक मोठ्या संकटात सापडले असल्याने, राज्यातून मदतीचे हात पुढे येत असताना. सामाजिक बांधिलकीतून सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस अंमलदार गणेश शिंदे यांनीही खारीचा वाटा उचलला असून, "माणुसकीची कास धरू, पूरग्रस्त बांधवांना मदत करू' असे म्हणत आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्त नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिला आहे.
पोलिस अंमलदार गणेश शिंदे यांनी नागरिकांच्या मूलभूत असलेल्या सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून, स्वतःहून ते रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाटप करणार आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या भागातील नागरिकांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यांच्या सामाजिक कार्याचे व खाकी वर्दीतील माणुसकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.