fight with corona e-sakal
सोलापूर

जिल्ह्यातील सव्वालाख रुग्णांची कोरोनावर मात! आज 1436 रुग्णांची वाढ

सोलापूर जिल्ह्यातील सव्वा लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

तात्या लांडगे

23 एप्रिल ते 23 मे या लॉकडाउनच्या काळात शहर-जिल्ह्यात एकूण 59 हजार 471 रुग्ण वाढले असून एक हजार 320 रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत

सोलापूर : शहरातील कोरोनाची (Covid-190 दुसरी लाट आता ओसरू लागली असून, आज शहरात 33 रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात एक हजार 503 रुग्ण वाढले असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणजे एकूण एक लाख 45 हजार 120 रुग्णांपैकी एक लाख 26 हजार 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या 15 हजार 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (A quarter of a lakh patients in Solapur district have been released from corona)

बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा या तालुक्‍यातील रुग्णसंख्या अजूनही कमी झालेली नाही. तर दक्षिण सोलापूर, माढा, बार्शी या तालुक्‍यातील मृत्यूदेखील कमी झालेले नाहीत. आज मंगळवेढ्यात 36, उत्तर सोलापुरात 18, पंढरपूर तालुक्‍यात 230, सांगोल्यात 86 रुग्ण वाढले आहेत. तर अक्‍कलकोट तालुक्‍यात 171 रुग्ण वाढले असून आठ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बार्शीत 257 तर माढ्यात 215 रुग्ण वाढले असून प्रत्येकी चौघांचा मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्‍यात 134, माळशिरस तालुक्‍यात 246 रुग्ण वाढले असून त्या दोन्ही तालुक्‍यातील प्रत्येकी दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तसेच मोहोळ तालुक्‍यात 84, दक्षिण सोलापुरात 26 रुग्ण वाढले असून दोन्ही तालुक्‍यात प्रत्येकी पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज ग्रामीण भागातील दोन हजार 66 रूग्ण बरे झाले आहेत. शहरासाठी दिलासा म्हणजे पाच, सात, आठ, नऊ, 11, 19, 20, 21 ते 26 या प्रभागाशिवाय अन्य प्रभागांमध्ये एकही रुग्ण आज आढळला नाही.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती

  • एकूण टेस्ट : 13,67,447

  • कोरोनाबाधित रुग्ण : 1,45,120

  • मृत्यू : 3,769

  • बरे झालेले रुग्ण : 1,26,044

  • उपचार घेणारे रुग्ण : 15,307

लॉकडाउनमध्ये आढळले 59,471 रुग्ण

कोरोनाची दुसरी लाट थोपवून लावण्यासाठी 23 एप्रिलपासून राज्यभर कडक लॉकडाउन करण्यात आला. 23 एप्रिल ते 23 मे या लॉकडाउनच्या काळात शहर-जिल्ह्यात एकूण 59 हजार 471 रुग्ण वाढले असून एक हजार 320 रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. त्यात शहरातील 367 रुग्णांचा समावेश असून लॉकडाउन काळात शहरात चार हजार 899 रुग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात मागील 30 दिवसांत 54 हजार 572 रुग्ण वाढले असून 953 रूग्णांचा मृत्यू या काळात झाला आहे. आता शहर- जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे, परंतु मृत्यूदराची चिंता कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुजरातच्या हातात महाराष्ट्राचं राजभवन! कोण आहेत नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत? सीपी राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर निर्णय

Latest Marathi News Updates : निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात तुंबळ हाणामारी

Crop Insurance: थकीत पीकविम्यापोटी १९० कोटी जमा करा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश, चार आठवड्यांची मुदत

Pimpri Chinchwad: बीआरटी स्थानके अंधारात; मद्यपींचा वावर, दिवे बंद असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Sangli Crime:' िसमकार्ड हॅक करून पोलिसदादांनाही हॅकर्सकडून गंडा'; धक्कादायक प्रकार उघडकीस

SCROLL FOR NEXT