road accident sakal
सोलापूर

सोलापूर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात! चार तरुण ठार, एक गंभीर

सोलापूर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात! चार तरुण ठार, एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा

विजयपूर - सोलापूर महामार्गावरील ब्रीजला कारची जोराची धडक बसून चौघांचा मृत्यू झाला.

सोलापूर : विजयपूर (Vijaypur) - सोलापूर (Solapur) महामार्गावरील ब्रीजला कारची जोराची धडक बसून चौघांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी झाला आहे. कवठेजवळ बुधवारी (ता. 5) पहाटे चार वाजताच्या सुमारास हख भीषण अपघात (Accident) झाला आहे. (A terrible accident has taken place on Solapur-Vijaypur highway)

अरुण कुमार लक्ष्मण (वय 21), महिबूब मोहम्मद अली मुल्ला (वय 18), फिरोज सैफसाब शेख (वय 20), मुन्ना केंभावे (वय 21, सर्व राहणार यरकल केंडी, तालुका सिंदगी, जिल्हा विजयपूर, कर्नाटक) (Karnataka) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

अरुण कुमार लक्ष्मण व इतर जखमी हे बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास कारमध्ये बसून विजयपूर ते सोलापूर नवीन महामार्गावरून सोलापूरकडे येत होते. पहाटे चारच्या सुमारास विजयपूर महामार्गावरील नवीन कवठे बायपास हायबे ब्रीजला कारची धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील सर्व जण गंभीर जखमी झाले. त्यातील चौघे ठार झाले व एक गंभीर जखमी आहे.

पाचजण सिंदगी ते पुणे (Pune) जात होते. कवठा बायपास हायवे ब्रिजला गाडी जाऊन धडक दिल्याने हा अपघात झाला व त्यात चारजण ठार झाले व एक जखमी आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : थरार... दक्षिण आफ्रिकेने दोनवेळा पराभव टाळला ! डबल Super over मध्ये अफगाणिस्तानचा करेक्ट 'गेम' केला

Tutankhamun’s Tomb : थडग्यात सापडली 3,300 वर्षे जुनी सँडल; शत्रूंना पायाखाली तुडवायचा राजा, सँडल्सवर का कोरली होती शत्रूंची चित्रे?

Post Office Jobs 2026: ग्रामीण डाक सेवक पदांची भरती अंतिम टप्प्यात; या उमेदवारांना संधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीत डीप क्लिनिंग मोहिमेची सुरुवात; महापौरांचा प्रत्यक्ष आढावा

"त्यांना मी रजनीकांतप्रमाणे धुणार" करण जोहर आणि विकीवर भडकला गोविंदा ; हे आहे कारण !

SCROLL FOR NEXT