election

 

sakal solapur

सोलापूर

Nagarpalika election: एका मतदारास ३ मतांचा अधिकार! सोलापूर जिल्ह्यात ११ नगरपरिषदा, एक नगरपंचायत; अकलूज, अनगरची पहिलीच निवडणूक

एका मतदारास त्यांच्या द्विसदस्यीय प्रभागातील दोन उमेदवारांना प्रत्येक मत द्यायचे आहे. तर यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने त्या उमेदवारालाही मतदारास तिसरे मत द्यावे लागणार आहे. ९०० ते एक हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र असणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, कुर्डुवाडी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ व अकलूज या नगरपरिषदांचा समावेश आहे. तर अनगर या एकमेव नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान होणार आहे. नगरपरिषदांमधील २७२ सदस्य तर एकमेव अनगर नगरपंचायतीत १७ नगरसेवक असणार आहेत. निवडणुकीस इच्छुक उमेदवारांना १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी चार लाख ४३ हजार ६०५ मतदार आहेत. त्यात ११ हजार ५१४ दुबार मतदार आहेत. त्या प्रत्येकाच्या घरी नगरपरिषदांचे अधिकारी- कर्मचारी जाणार आहेत. त्यांना नेमके कोणत्या प्रभागात किंवा नगरपरिषदेसाठी मतदान करायचे आहे, हे त्यांच्याकडून लिखित घेतले जाणार आहे. एका मतदारास त्यांच्या द्विसदस्यीय प्रभागातील दोन उमेदवारांना प्रत्येक मत द्यायचे आहे. तर यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने त्या उमेदवारालाही मतदारास तिसरे मत द्यावे लागणार आहे.

९०० ते एक हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र असणार आहे. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात एकूण १५० हून अधिक मतदान केंद्रे असणार आहेत. दरम्यान, सांगोला व अक्कलकोट नगरपरिषदेत सदस्य संख्या विषम असल्याने तेथे शेवटचा प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे.

आचारसंहिता कोठे लागू अन्‌ कशी?

निवडणूक जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत फक्त आचारसंहिता लागू असणार आहे. पण, या नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या हद्दीतील मतदारांवर प्रभाव पडेल, असे कार्यक्रम जिल्ह्यात इतरत्र घेता येणार नाही. तसे झाल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरणार आहे.

मतदारांना मोबाईल बंदी, निवडणूक खर्चात वाढ

मतदानास जाताना मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्यासंबंधीचा निर्णय आवश्यकतेनुसार तेथील मतदान अधिकारी घेतील. दुसरीकडे उमेदवारांच्या निवडणूक खर्चातही वाढ करण्यात आली आहे. ‘अ’ वर्गाच्या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारास १५ लाख तर सदस्यांसाठी नऊ लाख, ‘ब’ वर्गाच्या नगरपरिषदांमधील अध्यक्षपदाच्या उमेदवारास ११ लाख २५ हजारांचा आणि सदस्यांसाठी साडेतीन लाखांपर्यंत मर्यादा आहे. ‘क’ वर्गाच्या नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये तर सदस्याच्या उमेदवारांना अडीच लाखांचा खर्च करता येणार आहे. तर ‘ड’ वर्गाच्या नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारास सहा लाख रुपये तर सदस्य उमेदवारास सव्वादोन लाख रुपयांचा खर्च करण्याची परवानगी असणार आहे.

नगरपरिषदांमधील मतदार अन्‌ नगरसेवक संख्या

  • बार्शी

  • नगरसेवक : ४२

  • मतदार : १,०९,०३५

  • -----------------------

  • अक्कलकोट

  • नगरसेवक : २५

  • मतदार : ३८,४७००

  • -----------------------

  • करमाळा

  • नगरसेवक : २०

  • मतदार : २२,१२३

  • -----------------------

  • मंगळवेढा

  • नगरसेवक : २०

  • मतदार : ३३,७५६

  • ----------------------

  • मोहोळ

  • नगरसेवक : २०

  • मतदार : २४,४१९

  • ---------------------

  • अकलूज

  • नगरसेवक : २६

  • मतदार : ३४,४२७

  • --------------------

  • पंढरपूर

  • नगरसेवक : ३६

  • मतदार : ९४,५५९

  • ---------------------

  • कुर्डुवाडी

  • नगरसेवक : २०

  • मतदार : २३,८८८

  • -----------------------

  • सांगोला

  • नगरसेवक : २३

  • मतदार : ३३,७०५

  • -----------------------

  • मैंदर्गी

  • नगरसेवक : २०

  • मतदार : १०,९०९

  • ----------------------

  • दुधनी

  • नगरसेवक : २०

  • मतदार : १०,९०९

  • ------------------------

  • अनगर नगरपंचायत

  • नगरसेवक : १७

  • मतदार : ११,०३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking : कुलदीप यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मध्येच बाहेर करणे पडले महागात, आयसीसीने दिला दणका...

Thane News: पाणी टंचाईच्या झळा, पण बेकायदा वॉशिंग सेंटरमधून सर्रास पाण्याची उधळपट्टी, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

Ozar News : पोलीस बनले समुपदेशक! नाशिकमध्ये अपहरणाचा बनाव करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोलिसांनी केले समुपदेशन, पालकांना दिला योग्य सल्ला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित महिलांच्या दावेदारीची चर्चा

Nashik Crime : नाशिकमध्ये 'एमडी' तस्कराच्या मुसक्या आवळल्या; ६५ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल.

SCROLL FOR NEXT