12th Practical Exam Updates esakal
सोलापूर

बारावीची आजपासून प्रात्यक्षिक परीक्षा! बोर्डाकडून प्राचार्य, शिक्षकांना सूचना

वेळापत्रकानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा उद्यापासून (सोमवारी) सुरु होत आहे. कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची तोंडी तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 3 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील एक लाख 10 हजार 229 शाळांमध्ये सव्वादोन कोटी विद्यार्थी प्रवेशित आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यांनतर 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या. मात्र, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीत 65 टक्‍क्‍यांवर गेलेली नाही. कोरोना काळात शाळाबाह्य मुलांची संख्या खूपच वाढली असून बालविवाहाचे प्रमाणही अधिक राहिले आहे. शाळकरी मुले शेतमजुरीवर दिसतात. आता शाळेतील विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीची कारणे शोधून त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. (12th Practical Exam Updates)

कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झाला, परंतु धोका टळलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देता येणार आहे. परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पडावी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी शिक्षकांनी खेळू नये, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. बोर्डाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत चालणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत सुरु राहील. प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच त्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुरु होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे बहुतेक महाविद्यालयांनी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा व त्यांचे प्रकल्पकार्य यापूर्वीच पूर्ण करून घेतले आहे. आता केवळ विज्ञान शाखेच्याच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागेल, असे चित्र आहे. तरीही, ज्या महाविद्यालयांनी तोंडी व प्रात्यक्षिक कार्य पूर्ण केलेले नाही, त्यांना वेळेत ते पूर्ण करावे लागणार आहे. प्रात्यक्षिक अथवा तोंडी परीक्षा घेताना प्रत्येक शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांनी कोरोना नियमांचे पालन तंतोतंत करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी मास्क घातलेला असावा, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांचा मोबाइल नॉट रिचेबल...
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सोमवारपासून (ता. 14) सुरु होत आहे. अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांना काही अडचणी असतात. त्यासंदर्भात ते माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधतात. कोरोना झाल्याने काही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षेला हजर राहता आले नाही, तर त्यांच्याबाबतीत काय निर्णय घ्यावा, अशाही शंका आहेत. परंतु, शिक्षणाधिकाऱ्यांचा मोबाइल बंद असल्याने त्यांचा हिरमुड झाला आणि त्यांनी प्रशासनातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनाच ते शंका विचारून माहिती घेतली.

प्राचार्यांना सूचना...
- कोरोनाचा धोका संपला नसल्याने प्रात्यक्षिक परीक्षेवेळी कोरोना नियमांचे करावे पालन
- विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यास त्यांचे गट करून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक कार्य करून घ्यावे
- प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकांकडे मास्क असावा, परीक्षेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे
- आजारपण अथवा काही कारणास्तव परीक्षेला न आलेल्या विद्यार्थ्यांना 3 मार्चपर्यंत कधीही बोलावून त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT