childrape
childrape 
सोलापूर

पत्र्याच्या शेडमध्ये 'त्याचा' अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : घरात कोणी नसलेल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सागर ज्ञानेश्‍वर धोत्रे याला जिल्हा न्यायाधिश यु. एल. जोशी यांनी सात वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली. 

जानेवारीत पिडीत अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत सागर धोत्रे याने मुलीला पत्राशेडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पिडीत मुलीच्या आईला त्या पत्राशेडमधून मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी दरवाजा ठोठावला, तेव्हा आरोपीने मी झोपलो आहे, म्हणत दार उघडला नाही. काही वेळाने आईने आणखी दोघांना घेऊन पुन्हा दरवाजा ठोठावला. त्यावेळी पिडीतेने दरवाजा उघडला. फिर्यादीने आरोपी व पिडीतेस काय झाले, असे विचारले. त्यावेळी आरोपी आपण काही केले नाही असे म्हणत होता, पण पिडीता रडत होती. फिर्यादीने पिडीतेला विश्‍वासात घेवून विचारले असता तिने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर आरोपी सागर धोत्रे यांच्या विरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीत मुलगी, फिर्यादी, तपास अधिकारी व तपास अंमलदार यांनी दिलेल्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यानुसार न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी कैद शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे ऍड. एस. आर. देशपांडे यांनी काम पाहिले. 

चार आरोपींना पोलिस आयुक्‍तांनी केले तडीपार 
येथील शिंदे चौक परिसरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांतील चार आरोपींना तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी दिले. त्यात प्रतापसिंग वसंतसिंग चव्हाण (वय 53), अजयसिंग विजयसिंग चव्हाण (वय 27), विजयसिंग पांडुरंगसिंग चव्हाण (वय 48) आणि रोहितसिंग वसंतसिंग चव्हाण (वय 26) या आरोपींचा समावेश आहे. शासकीय कामात अडथळा, जीवे मारण्याची धमकी तथा प्रयत्न करणे अशा विविध गुन्ह्यांत यांची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर चौघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. 


मयत टिपर चालकाविरुद्धच गुन्हा 
येथील अक्‍कलकोट रस्त्याजवळील पाण्याच्या टाकी परिसरात डस्ट खाली करून मड्डी वस्तीकडे जात असताना चिराग रेसिडेन्सीसमोर (रविवार पेठ) टिपरचा अपघात झाला. त्यात टिपर चालक खाजप्पा सिद्राम पवार (रा. मड्डी वस्ती) याचा मृत्यू झाला. हयगयीने, अविचाराने व अतिवेगाने टिपर चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टिपर चालकाविरुद्धच जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला, अशी फिर्याद विश्‍वनाथ रघुनाथ भांडेकर यांनी दिली आहे. डाव्या बाजूने पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वाराकडे पाहत असताना टिपर चालक खाजप्पाचे समोर लक्ष राहिले नाही. त्यामुळे त्याचे टिपरवरील नियंत्रण सुटले आणि टिपर रस्त्याच्या दुभाजकावर चढला. त्यामध्ये फिर्यादी विश्‍वनाथ रघुनाथ भांडेकर (रा. हनुमान मंदिर, मड्डी वस्ती) यांच्या दोन्ही पायास जखम झाली. तसेच ऋषिकेश ऊर्फ पिंटू चितलप्पा साळुंखे यास मुक्‍का मार लागला. त्यामध्ये आरोपी खाजप्पास जबर मार लागून जखमी झाला. या अपघातात तो स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT