biometric 
सोलापूर

Big Breaking ! गैरहजर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री, "एवढे' कर्मचारी परस्पर सुटीवर 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना काळात परस्पर सुटी घेऊ नये, दीर्घ मुदतीची सुटी मिळणार नाही आणि विभाग प्रमुखांच्या पूर्वसंमतीशिवाय कोणीही रजा घेऊ नये, असे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. तरीही विभाग प्रमुखांची पूर्वसंमती न घेता परस्पर सुटीवर गेलेल्या सुमारे चारशे कर्मचाऱ्यांचे 22 लाख 13 हजार रुपयांचे वेतन कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 

महापालिकेचे आठ झोन असून, यापैकी काही झोनमधील कर्मचारी विभागप्रमुख असतानाही परस्पर रजेवर जाण्याचे प्रकार वाढल्याचे चित्र आहे. सकाळी हजेरी नोंदवून गेल्यानंतर थेट सुटी होतानाच हजेरी नोंदवायला येणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. अशा सर्व प्रकारांची माहिती आता महापालिका आयुक्‍तांनी सामान्य प्रशासनाकडून मागविली आहे. कायमस्वरूपी कामगार असतानाही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगार परस्पर गैरहजर राहण्यात अव्वल आहेत. दुसरीकडे आरोग्य व पाणीपुरवठा विभागातही असाच प्रकार सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कामगारांवर कारवाई करण्यापूर्वीच काही नगरसेवकांचा दबाव येतो, अशीही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर आता परस्पर सुटीवर जाणाऱ्या आणि कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करा, असे आदेश महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासनाने दरमहा प्रत्येक विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम हाती घेतले आहे. 

मशिन बंद असताना "बायोमेट्रिक'चा निर्णय 
महापालिकेच्या आरोग्य विभाग, नागरी आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, भूमी व मालमत्ता, सामान्य प्रशासन यासह अन्य विभागांमध्ये सुमारे अडीचशे बायोमेट्रिक मशिन आहेत. कोरोना काळात बहुतांश कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महापालिका आयुक्‍तांनी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापैकी 160 मशिन बंद आहेत. काही मशिनचा रिचार्ज संपला आहे, तर काही मशिन बिघडल्या आहेत. आता संगणक विभागाने सर्व मशिन तपासणी सुरू केली असून तूर्तास कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच हजेरी नोंदवावी लागणार आहे. 

महापालिकेच्या कामगारांची स्थिती 

  • कामयस्वरूपी कामगार : 5200 
  • कंत्राटी कर्मचारी : 450 
  • वेतनासाठी दरमहा लागणारी रक्‍कम : 16.50 कोटी 
  • जुलैत परस्पर गैरहजर कर्मचारी : 387 
  • वेतन कपातीची रक्‍कम : 2.13 लाख 

फोटो पाठवला नाही अथवा कामावर आले नाहीत त्यांचे वेतन कपात 
महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली असून, बंद मशिन दुरुस्त करून त्याची सुरवात लवकरच होईल. तत्पूर्वी, जुलैमध्ये जिओ टॅगिंगनुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेळेत फोटो संबंधित विभागप्रमुखांकडे पाठविणे बंधनकारक होते. मात्र, ज्यांनी तीन दिवस उशिरा फोटो पाठविला त्यांचा एक दिवसाचा पगार आणि ज्यांनी फोटो पाठवला नाही अथवा कामावर आले नाहीत त्यांचेही वेतन दिले जाणार नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT