Sonu Sood Canva
सोलापूर

सोलापुरी चादर पाहून भारावला सोनू सूद ! "जय हिंद'ने दिली भेट

सोलापुरी चादर पाहून भारावला सोनू सूद ! "जयहिंद'च्या पदाधिकाऱ्यांनी दिली भेट

श्रीनिवास दुध्याल

सोलापुरी चादरीची आपुलकी दाखवत "माझ्या वडिलांच्या दुकानात सोलापुरी चादर विक्रीसाठी ठेवण्यात येत होती' असे सांगत सोनू सूद यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

सोलापूर : येथील जय हिंद फूड बॅंकेच्या (Jai Hind Food Bank) वतीने लॉकडाउन (Lockdown) काळात करण्यात आलेल्या कार्यामध्ये सूद चॅरिटी फाउंडेशन (Sood Charity Foundation) यांच्या योगदानातून सोलापुरातील गरजूंना जेवण पुरवण्यात आले होते. या कार्याचा आढावा बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली. अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. या वेळी जय हिंद फूड बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी सोनू सूद यांना सोलापुरी चादर भेट दिली. सोलापुरी चादरीबाबत आपुलकी दाखवत "माझ्या वडिलांच्या दुकानात सोलापुरी चादर विक्रीसाठी ठेवण्यात येत होती' असे सांगत सोनू सूद यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. (Actor Sonu Sood was happy to see the Solapuri chaddar provided by Jai Hind Food Bank)

सोनू सूद व सूद चॅरिटी फाउंडेशनचे स्वयंसेवक विपुल मिरजकर यांच्या माध्यमातून बेघर लोकांना जेवण देणे व परप्रांतीय लोकांना गावी पोचवणे आदी उपक्रम झाले. तसेच सोलापूर शहरातील निराधार लोकांना जेवण देण्यात आले. या कार्यक्रमात जय हिंद फूड बॅंकेच्या नवीन टी-शर्टचे अनावरण सोनू सूद यांच्या हस्ते झाले. या वेळी सूद चॅरिटी फाउंडेशनचे विपुल मिरजकर, स्पर्शरंग कला परिवारचे सागर सुब्रमणी भारती, जय हिंद फूड बॅंकेचे सतीश तमशेट्टी आणि शुभम बल्ला आदी उपस्थित होते.

या वेळी जय हिंद फूड बॅंकेचे संस्थापक सतीश तमशेट्टी यांनी "भूकमुक्त भारत' उपक्रमाची माहिती दिली. स्पर्शरंग कला परिवाराच्या उपक्रमाची माहिती कला परिवाराचे विपुल मिरजकर व सागर सुब्रमणी भारती यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT