Adinath Sahakari Sugar Factory has been sanctioned for leasing to Rohit Pawar's Baramati Agro 
सोलापूर

आदिनाथ सहकारी साखर कारखाना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोला भाडेतत्वावर देण्याचा ठराव

आण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना 25 वर्षासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बारामती अॅग्रोला चालण्यास देण्याचा निर्णय कारखान्याच्या 49 वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. ही वर्षिक सर्वसाधारण सभा आॅनलाईन पध्दतीने घेण्यात आली. उपस्थित 612 सभासदांपैकी 600 म्हणजे 98 टक्के सभासदांनी कारखानी बारामती अॅग्रोला कारखाना 25 वर्ष चालवण्यास देण्याच्या बाजूने मतदान केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी सांगितले की, या सर्वसाधारण सभेमध्ये श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना २५ वर्षासाठी भाडेपट्टा करार देण्याच्या शिखर बॅकेच्या ठरावाला 98 टक्के सभासदांनी मतदान केल्यामुळे हा कारखाना अधिकृतरित्या बारामती अॅग्रोकडे जाण्याचा अडथळा आता संपला आहे. सभेत सभासद, वाहतूकदार, कर्मचारी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. या सर्वसाधारण सभेवेळी कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी ठरावाचे वाचन व प्रश्नाचे वाचन केले तर कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी आभार व्यक्त केले.

यासभेला कारखान्याचे मार्गदर्शक संचालिका रश्मी बागल, नानासाहेब लोकरे, पांडूरंग जाधव, प्रकाश पाटील, अविनाश वळेकर, नामदेव भोगे, मंदा लक्ष्मण गोडगे, भामाबाई दिलीप केकाण, सचिन पांढरे, आशिष गायकवाड, स्मिता पवार उपस्थित होते.

आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यावरून गेली चार महिन्यापासून चर्चा सुरू होती. कारखाना नेमका 15 कि 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर द्यायचा ? यावरून संचालक मंडळातही वाद होता. माञ आजच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या 25 वर्षासाठी कारखाना देण्याचा निर्णय झाला आहे. कारखान्याची पुढील कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाणार आहे.

तर आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रोला देण्यासाठी आजची ऑनलाईन 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मॅनेज केली असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष रमेश कांबळे यांनी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

मुलगी झाली हो...! कमळी मालिकेतील अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT