doctor.jpg 
सोलापूर

मोहोळमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रशासन व खासगी डॉक्‍टरांनी ठरवली रणनिती 

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ(सोलापूर): कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रशासन व खासगी डॉक्‍टरांनी एकत्र येऊन समन्वयाच्या आधारे सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाची कारवाईच्या पलीकडे जाऊन रुग्णांच्या उपचाराला प्राधान्य देण्याचे या बैठकीत ठरले. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात येत असलेले उपाय व खबरदारीच्या पार्श्‍वभूमीवर पंचायत समितीच्या सभागृहात आमदार यशवंत माने यांच्या आदेशाने गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आरोग्य प्रशासन, नगरपरिषद व खासगी व्यावसायिक डॉक्‍टर यांच्यात बैठक झाली. 
सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने शहर व तालुक्‍यातील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांच्या संपर्कात काही रुग्ण येत आहेत. परिणामी नियमित सेवा देणाऱ्या खासगी डॉक्‍टरांना प्रशासनाच्या काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. फक्त चौकशीसाठी प्रशासनाची साधी गाडी जरी आली तरी अतिउत्साही अशा व्यक्तींकडून सोशल मीडियावर संबंधित डॉक्‍टर, त्यांचे दवाखान्याचे नाव टाकून सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. परिणामी रुग्णांच्या मनात भीती व डॉक्‍टरांची बदनामी अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

एकीकडे शासन बंद दवाखान्याच्या डॉक्‍टरावर कारवाई करीत आहे. तर दुसरीकडे सर्व सुरक्षेची काळजी घेत नियमित सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत मोहोळ तालुका डॉक्‍टर असोसिएशनने तालुक्‍याचे आमदार यशवंत माने यांच्याकडे कैफियत मांडली होती. आमदार माने यांनी या संदर्भात तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे यांना सूचना देऊन या बैठकीचे आयोजन केले होते. 
या बैठकीत प्रशासन व डॉक्‍टर यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. रुग्ण हेच दैवत समजून त्यांना योग्य ती ट्रीटमेंट द्यावी. याबरोबरच योग्य त्या समन्वयाने टीमवर्क करून कोरोनाच्या विरोध लढा देण्याचा प्रयत्न करू, असे दोन्ही बाजूंनी आश्‍वासित करण्यात आले. या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी पाथरूट, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक गायकवाड, नगरपरिषदेचे अभियंता अमित लोमटे, राजकुमार सपाटे, डॉक्‍टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश झाडबुके यांच्यासह डॉ. संतोष गुजरे, प्रमोद पाटील, अमोल हराळे, शहाजी डोंगरे, अभय कुर्डे, डॉ. गणेशप्रसाद गुंड, मिलिंद लामगुंडे, तुषार म्हेत्रे आदी डॉक्‍टर उपस्थित होते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT