मोदी जॅकेटनंतर आता सोलापुरी चादर जॅकेटची क्रेझ ! पॉपस्टार निक जोनासमुळे नव्या फॅशनची ट्रेंड
मोदी जॅकेटनंतर आता सोलापुरी चादर जॅकेटची क्रेझ ! पॉपस्टार निक जोनासमुळे नव्या फॅशनची ट्रेंड  Canva
सोलापूर

मोदी जॅकेटनंतर आता सोलापुरी चादर जॅकेटची क्रेझ !

श्रीनिवास दुध्याल

सोलापुरी चादरीचे जॅकेट घालून राजू राठी व त्यांचे पुत्र राघव राठी यांनी फोटोसेशन केले आहे. या आकर्षक जॅकेटमुळे "मोदी जॅकेट'नंतर आता "सोलापुरी चादर जॅकेट'ची क्रेझ निर्माण होत आहे.

सोलापूर : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (Actress Priyanka Chopra) पती, अमेरिकन पॉपस्टार निक जोनास (American popstar Nick Jonas) हा सेंट लुईसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सोलापुरी जेकार्ड चादरीचा (Solapuri Chaddar) शर्ट घालून सहभागी झाला होता व त्याने 'या कपड्यांनी मला ऊब दिली' असे म्हणत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. यामुळे सोलापुरी चादर पुन्हा एकदा जगात चर्चेचा विषय ठरली आहे. ती चादर सोलापुरातील चाटला टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीमध्ये (Chatla Textile) तयार झाली होती. निक जोनासच्या फोटोंमुळे सोलापुरी चादर पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आली आहे. त्याच्याही पुढचे पाऊल सोलापुरातील उद्योजकांनी टाकले असून, सोलापुरात तयार होणाऱ्या चादरीपासून आता जॅकेटही तयार जात आहेत. सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी (Raju Rathi) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सोलापुरी चादरीचे सुंदर व आकर्षक जॅकेट घालून त्यांनी व त्यांचे पुत्र राघव राठी यांनी फोटोसेशनही केले आहे. या आकर्षक जॅकेटमुळे 'मोदी जॅकेट'नंतर (Modi Jacket) आता 'सोलापुरी चादर जॅकेट'ची (Solapuri Chadda Jacket) क्रेझ निर्माण होत आहे.

सोलापूरच्या पारंपरिक जेकार्ड चादरीची (Solapuri Chaddar) तसे पाहिल्यास जगभर ख्याती. सोलापुरी चादरीची वैशिष्ट्ये ही की, आकर्षक डिझाईन, जाडसर, प्युअर कॉटन (Pure Cotton), ऊबदार, टिकाऊपणा. परंतु, या चादरीचे इतर राज्यांतून डुप्लिकेशन सुरू होऊन सोलापुरी चादरीला (Solapur Chaddar) बसला आहे. सोलापूरची चादर पांघरूण घेण्यासाठी उपयोगी आहे, असे म्हटले जाते. मात्र, त्याचा आकर्षक फॅशनेबल शर्टही (Fashionable shirts) शिवून घेतला जाऊ शकतो, हे कोणाच्या मनातही आलं नसेल. मात्र चादरीपासून फॅशनेबल शर्ट शिवला जातो व तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो, हे सिद्ध केलंय अमेरिकन पॉपस्टार निक जोनास (American popstar Nick Jonas) याने. हो आपली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Actress Priyanka Chopra) हिचा पती निक जोनासने!

निकच्या चादरीच्या शर्टाच्या बाहींवर "चाटला आर' हा ट्रेडमार्क लिहिलेला दिसून येतो. विशेष म्हणजे, चाटला टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीजचे मालक गोवर्धन चाटला यांनाही त्यांच्या फॅक्‍टरीमधून तयार झालेल्या चादरपासून शर्ट तयार झाल्याचा व तोही अमेरिकन पॉप सिंगर निक जोनासने तो घातलेला पाहून आश्‍चर्य वाटले. मात्र यामुळे सोलापुरी चादरीची कीर्ती आता फॅशनेबल शर्टाच्या माध्यमातून सातासमुद्रापर्यंत पोचल्याचे समाधान गोवर्धन चाटला यांनी "सकाळ'शी बोलतान व्यक्त केले.

'जुनं ते सोनं'चा प्रत्यय

निक जोनासने घातलेल्या चादरीच्या शर्टाच्या डिझाईनबाबत चाटला टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीचे गोवर्धन चाटला म्हणाले, ही डिझाईन आमच्या आजोबांपासून चालत आलेली आहे. इतकी जुनी डिझाईन्स आजही आकर्षक वाटते व त्यापासून शर्टही बनवला जातो, हे पाहून मला आश्‍चर्य वाटले. आमची उत्पादने देशभर पोचलेली आहेत. मात्र यामुळे सोलापुरी चादरीचा नावलौकिक या वेळी पांघरूण घेण्यासाठीच नव्हे फॅशनेबल वस्त्रांसाठी झाल्याचे समाधान वाटते. याबाबत आता सोलापुरातील तसेच देशातील फॅशन डिझायनर्सने पुढचे पाऊल टाकायला हवे.

जेकार्ड सोलापुरी चादरीच्या जॅकेटबाबत राजू राठी म्हणाले, निक जोनासने जेकार्ड चादरीचा शट परिधान करून सोलापुरी चादरीला प्रसिद्धी दिली. त्याआधीच आम्ही जेकार्ड चादरीपासून शर्ट तयार केले होते. लेडीज बाथरोब तयार केले आहे. पूर्वी हॉटेलमध्ये बाथरोब वापरले जायचे, आता महिला घरातही बाथरोब वापरत आहेत. आता जॅकेट तयार करण्याचा निर्णय घेतला अन्‌ साध्या डिलक्‍स 90 बाय 60 चादरीपासून जॅकेट तयार केले आहेत. या चादरीची किंमत केवळ साडेतीनशे रुपये असून, एका चादरमधून दोन जॅकेट तयार होतात. तरुण व तरुणींसाठी आता सोलापुरी चादरपासून जॅकेट तयार करण्याचे लक्ष्य ठेवले असून, कल्याणी सोलापुरी जॅकेट असं ब्रॅंडिंगही केलं आहे. जॅकेट तयार करण्याचे काम एखाद्या कारखान्याला दिलेलं नाही तर शहरातील टेलर्सकडे दिले आहे. त्यासाठी एक टीम तयार केली असून, जॅकेटचे मार्केटिंगही करणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही या जॅकेटची मागणी केली आहे, असे राजू राठी यांनी "ई-सकाळ'शी बोलताना सांगितले.

पूर्वी सोलापुरात 20 हजार लूम्सवर चादरी तयार व्हायच्या, आता सोलापूर चादरीची क्रेझ कमी झाल्याने चार हजार लूम्सवरच उत्पादन होत आहे. मात्र, चादरीपासून असे फॅशनेबल पेहरात तयार केल्यास जगभरातून सोलापुरी चादरीला पुन्हा सोन्याचे दिवस येतील, हे निश्‍चित.

- राजू राठी, अध्यक्ष, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रिकल्चर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT