राजकारण बाजार समितीचे ! उपसभापती नरोळेंचा राजीनामा म्हेत्रेंच्या हातात Canva
सोलापूर

राजकारण बाजार समितीचे! उपसभापती नरोळेंचा राजीनामा म्हेत्रेंच्या हातात

राजकारण बाजार समितीचे ! उपसभापती नरोळेंचा राजीनामा म्हेत्रेंच्या हातात

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण सध्या तापले आहे.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Solapur Krushi Utpanna Bajar Samiti) राजकारण सध्या तापले आहे. सभापतिपदावरून आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांना हटविण्यासाठी सोलापुरातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते सक्रिय झाले आहेत. भाजप (BJP) आमदार तथा समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपसभापती श्रीशैल नरोळे (Deputy Speaker Srishail Narole) यांनी राजीनामा दिला आहे. उपसभापती नरोळेंचा राजीनामा सभापती म्हणून आमदार देशमुख यांच्याकडे जाणे अपेक्षित होते; मात्र उपसभापती नरोळे यांनी हा राजीनामा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Former Minister Siddharam Mhetre) यांच्याकडे दिला आहे. माजी मंत्री म्हेत्रेंकडून हा राजीनामा कुठे जातो? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना रोखण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी एकत्रित येत सर्वपक्षीय आघाडी करून निवडणूक लढविली आणि जिंकली. बाजार समितीच्या राजकारणात आता पक्षीय हेवेदावे सुरू झाले आहेत. सर्वानुमते ठरलेल्या निर्णयानुसार सभापती देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आता सर्वपक्षीय आघाडीतील नेते करू लागले आहेत. सभापती देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा दिला नाही तर त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणण्याचीही तयारी बाजार समितीच्या संचालकांनी सुरू केली आहे.

सभापती देशमुख स्वत:हून राजीनामा देतात की अविश्‍वास ठराव आणला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती देशमुख यांनी ठरल्यानुसार स्वत:हून राजीनामा द्यावा, त्यासाठी आम्ही आणखी काही दिवस वाट पाहू, त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्यावर अविश्‍वास ठराव आणू, अशी भूमिका बाजार समितीच्या श्रेष्ठींनी घेतल्याचे समजते.

बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने निवडणूक जिंकली. आमदार विजयकुमार देशमुख यांचा कार्यकाळ संपला असून त्यांनी शब्द पाळावा. आमदार विजयकुमार देशमुख हे मोठे नेते आहेत. त्यांचे पक्षात नाव आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. त्यांच्या प्रतिमेला आम्हाला धक्का लावायचा नाही.

- सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री

म्हेत्रेंचे नरोळे कनेक्‍शन

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील गावांमध्ये श्रीशैल नरोळे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत नरोळे यांनी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना पराभूत करून आपली लोकप्रियता दाखवून दिली आहे. अक्कलकोटच्या आमदारकीत दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील त्या गावांचा वाटा मोलाचा राहात आहे. त्यामुळे म्हेत्रे आणि नरोळे यांचे हे वेगळे कनेक्‍शन मानले जात आहे. नरोळेंच्या बाबीत म्हेत्रे काय निर्णय घेतात? बाजार समितीच्या राजकारणासाठी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गणिताचा विचार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडे तरुणांची गर्दी; ५०० इच्छुकांच्या मुलाखती!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन हद्दीत खुनाची घटना; संशयिताच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना!

Sinhagad Fort Exhibition : सिंहगडावर शिवकालीन वैभवाचा जागर; ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन!

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

SCROLL FOR NEXT