छावणी चालकांना दंडाच्या नोटिसा महसूल खात्याकडून बजावण्यात आल्या sakal
सोलापूर

अडीच वर्षानंतर छावणीचालकांना दंडाच्या नोटिसा,देयके ही प्रलंबित

छावणी चालकांना दंडाच्या नोटिसा महसूल खात्याकडून बजावण्यात आल्यामुळे छावणी चालकात खळबळ उडाली

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : तत्कालीन भाजप सरकारच्या काळात 2019 च्या दुष्काळामध्ये तालुक्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या जनावराच्या छावण्याची देयकासाठी तब्बल अडीच वर्षांनंतरही महाविकास आघाडी सरकारने तरतूद केली नाही.उलट अडीच वर्षानंतर या छावणी चालकांना दंडाच्या नोटिसा महसूल खात्याकडून बजावण्यात आल्यामुळे छावणी चालकात खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सन 2019 च्या दुष्काळात तालुक्यामध्ये जनावराची उपासमार होऊ नये म्हणून छावण्या सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये जनावराची दैनिक तपासणी तलाठी,मंडलाधिकारी,ग्रामसेवक,पशुधन अधिकारी,नगरपालिका,सहायक निबंधक,कृषी,उजनी,कोषागार,खात्याच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ऑनलाईन हजेरी,सीसीटीव्ही कॅमेरे,जनावरांची देखरेख व त्यांचे व्यवस्थापन जनावरा दिल्या जाणाऱ्या सुविधा वर लक्ष ठेवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली. मात्र दुष्काळ संपल्यानंतर छावण्या बंद करण्याचा अंतिम टप्प्यात मंगळवेढा व सांगोला या तालुक्यातील जवळपास 38 कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत.

सदरचा हंगामात छावणी सुरू करण्यासाठी शासनाने अनेक अटी घालून देण्यात आल्या होत्या या जाचक अटीमुळे सुरूवातीला अनेकांनी प्रस्ताव टाकण्यासाठी विलंब केला तरी देखील काहींनी या जाचक अटींचा स्वीकार करत मुक्‍या जनावराची गैरसोय होऊ नये म्हणून चारा छावण्या सुरू केल्या अटीच्या पूर्ततेसाठी दररोज महसूल खात्याच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी केली जात होती त्यामुळे या छावण्यांमध्ये नियमाचा अधिक खोडा घातल्यामुळे उशिरा सुरू झाल्या सुरुवातीच्या काळात 300 जनावरांची अट घातली त्यामुळे 300 ची संख्या होईपर्यंत छावणी चालकाला पदरमोड करावी लागली.त्यानंतरची संख्या ग्राह्य धरण्यात आली आणि बंद करतेवेळी कमी झालेली जनावरे झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी छावण्या बंद करू नयेत अशी सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे छावणी चालकांनी कमी जनावरे देखील स्वखर्चाने जतन केले आणि त्यामुळे कमी जनावरे संख्या महसूल खात्याने ग्राह्य धरण्यात आली नसल्याची ओरड सुरू झाली.

जनावरे जतन करण्यासाठी उधारीवर घेतलेल्या चारा पशुखाद्य व इतर खर्चाची देयके छावणी चालकांना देणेकराच्या दररोजच्या तगाद्यामुळे स्थानिक संस्था व बँकांची कर्जे काढून अदा करावी लागली.अशा परिस्थितीत सध्या तब्बल अडीच वर्षानंतर अडकलेले बिल मिळावे म्हणून ठेवले चालकांनी महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्यांच्या दालनाचे उंबरठे झिजवली परंतु अद्याप बिले अदा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही उलट त्यांना त्या कालावधीतील चुकाबाबत दंड भरण्याबाबत चा नोटिसा बजावण्यात आल्या वास्तविक पाहता या कालावधीत सर्व काही आलबेल आहे असे सांगणारे महसूलसह इतर खात्याचे अधिकाय्रांना मोकळे सोडून फक्त छावणी चालकांना दंडाच्या नोटिसा बजावण्याचे काम महसूल खात्याने का केले ? असा सवाल यानिमित्ताने विचारला जावू लागला. वास्तविक पाहता त्यांना बजावलेल्या नोटीस नंतर खुलासा देण्याची संधी देणे अपेक्षित होते परंतु तशी संधी दिली देण्यात आली नसल्याचे छावणी चालकातून सांगण्यात आले.

सरकार आणि अधिकाऱ्यांची धोरण असेच राहिल्याने छावणीतून मिळणारा लाभ व्याजात जावू लागल्याने कर्जबाजारी होत चालल्या ने भविष्यात राजकीय व अधिकाऱ्याच्या सुडचक्रात न सापडण्यापेक्षा छावण्याच सुरू न केलेल्या बय्रा अशी मानसिकता होऊ लागली.बिलासाठी मनधरणी करूनही दंडाची नोटीस दिल्यामुळे छावणी चालकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार झाल्यासारखी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT