agricultural fertilizer rate farmers milk agro products solapur esakal
सोलापूर

Solapur News : पशुखाद्य व चाऱ्याचे दर गगणाला भिडल्याने मोहोळ तालुक्यातील दुध उत्पादक अडचणीत

टोमॅटो, काकडी, झेंडू, शेवंती, ऊस यासह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ या फळबागाही जोपासल्या

राजकुमार शहा

मोहोळ : अचानक कमी झालेले दुधाचे दर व जनावरांना लागणारे विविध पशुखाद्य व चारा यांचे दर गगनाला भिडल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ग्रामीण भागात सर्रास शेती केली जाते. टोमॅटो, काकडी, झेंडू, शेवंती, ऊस यासह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ या फळबागाही जोपासल्या जातात.

शेतीचा खर्च शेतीवर भागत नसल्याने शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. दुधाच्या दर दहा दिवसाला पगारी बँकेत खात्यावर जमा होत असल्याने त्यावर शेतीच्या मशागतीचा, फवारणीसाठी लागणारी औषधे, रासायनिक खते, बि- बियाणांचा त्याच बरोबर प्रपंचाचा खर्चही भागतो.

सध्या दुधाचे दर कमी झालेत, तर जनावरांच्या चाऱ्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या कडक उन्हाळा असल्याने उष्णतेमुळे जनावरे दूध देण्याचे प्रमाण घटले आहे. दिवसातून एक वेळ तरी हिरवा चारा त्यांना द्यावा लागतो. मात्र सध्या चारा विकत घेऊन जनावरांना घालणे म्हणजे मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय असल्याने जनावरांची संख्याही वाढती आहे. त्यामुळे पशुखाद्या सह त्यांना हिरवी मका, कडवळ, ऊस, खापरी पेंड, मका भरडा, आधी चारा द्यावा लागतो. दुधाचे पैसे व चाऱ्याच्या खरेदीची पैशाचा हिशोब केला तर हातात काहीच शिल्लक राहत नाही.

केवळ शेतीला खत म्हणून जनावरां पासून मिळणाऱ्या शेणा वरच समाधान मानावे लागते. त्यामुळे "हरभरे खाल्ले हात कोरडे" अशी अवस्था दूध उत्पादकाची झाली आहे. ज्या शेतकऱ्याकडे जनावरे जास्त आहेत त्यांचे दररोजचे दूधही जास्त आहे. कमीत कमी 100 लिटर पासून 200 ते 300 लिटर पर्यंत दूध डेअरीला दिले जाते. प्रति लिटर तीन रुपये घट म्हटले तरी हजारो रुपयांची तूट येते, त्यामुळे हा ताळमेळ बसविता बसविताच शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

ग्रामीण भागातील पशुखाद्य व चाऱ्यांचे दर पुढील प्रमाणे

  • विविध पशुखाद्य पोते-1 हजार 700 रुपये

  • मका भरड़ा पिशवी-1 हजार 250

  • खापरी पेंड-2 हजार 800

  • कडवळ-1 हजार 200 रूपये गुंठा

  • हिरवे मकवान-1 हजार 700 गुंठा

  • ऊस-3 हजार 500 गुंठा

  • कडबा- 20 रुपये प्रतिपेंढी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षकांना अतिरिक्त होण्याची धास्ती! सप्टेंबरअखेरच्या आधारव्हॅलिड पटसंख्येवर होणार संचमान्यता; शिक्षकांना वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी देण्याचाही निर्णय

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2025

अग्रलेख : शक्तिपरीक्षेचे रंग

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 सप्टेंबर 2025

माण तालुका हादरला! 'राणंदमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धेचा खून'; शेतातच आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT