kutri digi.jpg 
सोलापूर

अजस्त्र जेसीबीने आपले काम केले, मात्र त्यानंतर सुरू झाले "त्या" मातेचे विव्हळणे.. !

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः अजस्त्र जेसीबी मशिनने काही मिनिटात सर्व परिसर अगदी झाडाझुडपासहीत सपाट केला....अन्नाच्या शोधात गेलेली ती कुत्री तेथे आली.......मोठ्या आवाजात ती विव्हळत होती अन डोळ्यातील मुक्‍या भावनेने तीने तरुणाच्या मनाला पाझर फोडला......आईची आर्त हाक त्याला समजली.....तब्बल दिड तासाच्या प्रयत्नानंतर अखेर तीचे आईपण जिंकल्याचे पाहून प्रत्येक जण अवाक झाला......हा प्रसंग प्रत्येकाच्या मनात कोरला गेला. 

हेही वाचा :  एकवीस वर्षानंतर पहाटगाण्याशिवाय दिवाळी 
 
आई ही जगात मानव किंवा प्राण्यात असो तीचे प्रेम सर्वत्र व्यापून उरलेले असते. तीने तीच्या बाळांवर केलेल्या प्रेम हे सर्वात मोठे असते. मुकी जनावरांची भाषा माणसाला कळत नाही. पण त्या पलिकडे आईची पिल्लाबद्दलची ओढ भाषेच्या सिमा ओलांडणारी असते. तीला भाषेत बांधता येत नाही. प्रत्येकाला या जगातील आई असणाऱ्या जीवाला मदत केलीच पाहीजे हाच खरा धर्म आहे हे मुके प्राणी माणसाला भाषा समजत नसली तरी बोलून दाखवतात. हे आईपण समजून घेण्यासाठी आपले ह्दय संवेदनशील असावे लागते याचा अनुभव जुळे सोलापुरात पाहण्यास मिळाला. 

जुळे सोलापूरातील गीता नगर भागात एका प्लॉटची मोकळी जागा आहे. काही कामासाठी दुपारी बाराच्या सुमारास तेथे जेसीबी आणले. तेथे वाढलेली दिड ते दोन फुट झुडूपे व जमीनीची सफाईचे काम सुरू झाले. जेसीबीसाठी हे काम अगदी सोपे होते. जेसीबीने सर्व झुडपे व काढलेली माती एका बाजूला लावली. काम आटोपल्यानंतर जेसीबी तेथून निघून गेले. अन्नाच्या शोधात गेलेली कुत्री तेथे आली. तेथे सर्व जमीनीत झालेला बदल पाहून ती मोठ्याने विव्हळू लागली. तीच्या विव्हळण्याचे कारण काही समजत नव्हते. मात्र तेथे असलेल्या संतोष नावाच्या तरुणासमोर ती विव्हळून सांगण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत होती. ती तोंडाने काही जागेच्या ठिकाणी खुणाही करत होती. तेव्हा या तरुणाला तीच्या विव्हळण्याने या ठिकाणी काही तरी आहे हे समजून आले. 

त्याने एक काठी घेवून प्रयत्न सुरू केले. त्याच्या मदतीला आणखी एक तरुण स्टंप घेऊन आला. हे तरुण काही कुत्रीने दाखवलेल्या जागावर शोध घेत होते. जागा सपाट झाल्याने काही सापडत नव्हते. ते खोदू लागल्यानंतर कुत्री त्याच्या भोवती फिरुन पुन्हा पुन्हा त्यांना मुक्‍या भावनेने तीची आईपणाची साद घालत होती. अखेर थोडेसे खोदल्यानंतर त्या खड्ड्यात चक्क तीची पाच पिल्ले दिसुन आली. कुत्रीने केलेल्या खड्ड्यामुळे हे पिल्ले जमीनीच्या खाली सुरक्षीत होते. जेसीबी फक्त वरच्या बाजुने फिरला होता. ती तशीच पिल्ल्याच्या जवळ गेली. तीने पिलांना हलवले तर ती जीवंत होती. तीने आधी एकेक पिलू तोंडात पकडून एक गाडीखाली घेऊन गेली. एक तास चाललेल्या या प्रकाराकडे परिसरातील नागरिक देखील चकीत होऊन पाहत होते. आईचे प्रेम व मायेचा हा मृत्युवर मात देणारा प्रसंग आईपणाचा नवा प्रत्यय देणारा ठरला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT