sakal
सोलापूर

अकलूजकरांनी केले गणरायाचे उत्साहात स्वागत

कोरोनाची तमा न बाळगता अकलूजकरांनी घरगुती गणपतीच्या स्थापना मोठ्या उत्साहाने केल्या.

शशिकांत कडबाने

अकलूज : कोरोनाची तमा न बाळगता अकलूजकरांनी घरगुती गणपतीच्या स्थापना मोठ्या उत्साहाने केल्या. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोणताही आरास वा मिरवणूक न काढता कोरोनाबाबतचे नियम पाळत अत्यंत साध्या व धार्मिक पद्धतीने गणेशाची स्थापना केली.

अकलूज शहरात लहानमोठी सुमारे 100 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या सर्व मंडळामध्ये सुसूत्रता व एकोपा असावा यासाठी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची स्थापना तत्कालीन सरपंच जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली. या मंडळाच्यावतीने आरास, मिरवणूक याच्या स्पर्धा घेत बक्षिसे दिली जातात.

बक्षिसे देताना मंडळाने सामाजिक, देशभक्ती, शैक्षणिक, पर्यावरण, भ्रूणहत्या विरोधी अशा प्रबोधन करणाऱ्या विषयांचा आरास, मिरवणुकीतील पारंपारिक वाद्यांचा वापर, दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी शिस्तबद्ध नियोजन आदींचा प्राधान्याने विचार होत होता. त्यामुळे गणपतीसमोर अतिशय चांगली आरास केली जायची.

मात्र गेल्या वर्षापासून कोरोनामुळे यामध्ये खंड पडलेला आहे. सर्व मोठ्या सार्वजनिक मंडळांनी अत्यंत साध्या पद्धतीने व धार्मिक रितीनुसार गणेश स्थापना केली. शाळा बंद असल्याने घरातच असणारी चिमुकली मंडळी मात्र आज गणेश आगमनानिमित्त बाहेर पडलेली दिसत होती.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात या चिमुकल्यांबरोबर तरूणाईने गणपतीचे उत्साहात स्वागत केले. यात तरूण मुलींची संख्या लक्षणीय होती. या प्रसंगी नाकातोंडावर असलेला मास्क अडचणीचा ठरत असला तरी काही पालक तो हटविण्यास मज्जाव करताना दिसत होते.

गर्दी तरीही अपेक्षित उलाढाल नाही

दरवर्षी अकलूज शहरात हनुमान मंदिर व विजय चौक या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीकरीता ठेवल्या जातात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिर बंद असल्याने फक्त जुने एसटी स्थानक ते विजय चौक या परिसरातच गणेश मूर्ती विक्रीस ठेवल्या गेल्या. या परिसरात सकाळपासून थोडीफार गर्दी होती.

गणेश मूर्तीबरोबरच कुंची, आसन, पाट व थर्मोकॉलची सुशोभित मकरमंदिरे व इतर आरासाचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी गर्दी केली होती. परंतु, बहुतांशी गणेश भक्तांनी फक्त गणेशमूर्तीच घेत इतर, साहित्य विकणाऱ्यांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. एकंदर कोरोनाचे निर्बंध शिथिल असूनसुद्धा बाजारपेठेत गर्दी दिसून आली असली तरी अपेक्षित उलाढाल झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

NH 465 Expansion: अक्कलकोटला नवा विकासमार्ग: राष्ट्रीय महामार्ग 465 रुंदीकरणासाठी 740 कोटी

SCROLL FOR NEXT