सोलापूर

सोलापुरातील सर्व दवाखान्यात होणार रुग्णांवर उपचार

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - शहरातील सर्व रुग्णालयांनी रुग्णांची कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता उपचार करावेत, असे आदेश महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी आज दिले. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही डॅाक्टरांनी आपली रुग्णालये बंद ठेवली आहेत किंवा रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत आहेत, अशा तक्रारी आल्याने आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत. रुग्णालये बंद ठेवले किंवा उपचारास नकार दिल्याप्रकरणी शहरातील 28 रुग्णालयांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. कोरोनाची तपासणी केली असेल तरच उपचार करण्यात येतील अशी भूमिका अनेक रुग्णालयात घेतली जात असल्याने रुग्णांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. 

आयुक्तांनी काढलेले आदेश या प्रमाणे
- महापालिका हद्दीतील सर्व इस्पितळांनी आपली सेवा शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी.
- इस्पितळातील एकूण खाटांची संख्या, भरलेल्या खाटांची संख्या, रिक्त खाटांची संख्या दर्शनी भागात लावावी.
- सर्व इस्पितळांनी त्यांच्याकडे उपचार घेण्यास परवानगी असलेल्या सर्व सेवा रुग्णांना उपलब्ध करून द्याव्यात. 

- शहरातील सर्व जनरल प्रॅक्टिशनरनी आपले दवाखाने ओपीडीसाठी किमान तीन तास सुरु ठेवावेत 
-कंटेनमेंट झोनमधील दवाखान्यांची फिव्हर ओपीडी सुरु ठेवणे बंधनकारक आहे
- सर्व दवाखान्यांनी त्यांच्या भागातील सर्व रुग्णांना सेवा देणे बंधनकारक आहे. 

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT