School Gallery
सोलापूर

नऊशे गावे कोरोनामुक्‍त तरी 238 शाळाच ऑफलाइन सुरू!

नऊशे गावे कोरोनामुक्‍त तरी 238 शाळाच ऑफलाइन सुरू! आठवी ते बारावीचा निर्णय सोमवारी

तात्या लांडगे

सोलापूर जिल्ह्यातील 900 कोरोनामुक्‍त गावांपैकी केवळ 350 गावांमधील 238 शाळाच ऑफलाइन सुरू आहेत.

सोलापूर : कोरोनामुक्‍त (Covid-19) गावांमध्ये आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यास परवानगी आहे. तरीही, सोलापूर जिल्ह्यातील 900 कोरोनामुक्‍त गावांपैकी केवळ 350 गावांमधील 238 शाळाच (School) ऑफलाइन सुरू आहेत. पालकांनी त्यांच्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावे, अशी भूमिका शिक्षण विभागाने (Education) घेतल्याने आठवी ते बारावीतील एकूण अडीच लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 14 हजार 259 विद्यार्थीच शाळेत हजर राहात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

राज्यात आठवी ते बारावीच्या 46 हजार 365 शाळा आहेत. त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या एक कोटी तीन लाख सात हजार 457 एवढी आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय अजूनही घेतलेला नाही. परंतु, त्यावरील वर्ग सुरू करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख) दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून विशेषत: दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले. कोरोनामुक्‍त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा अधिकार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविला. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्याने मुख्याध्यापकांनी मुलांच्या पालकांकडून संमतिपत्र घ्यायला सुरवात केली. दुसरीकडे, कोरोनामुक्‍त गाव झाले, परंतु पुन्हा एखादा रुग्ण आढळला तर रिस्क नको म्हणून अजूनही त्या गावांमध्ये ऑफलाइन शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही. ग्रामीण भागातील बहुतेक मुलांकडे अँड्राईड मोबाईल नाहीत, नेटवर्कचा अडथळा असल्याने ऑनलाइन शिक्षणापासूनही ते विद्यार्थी दूर आहेत. शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसो दूर गेलेल्या मुलांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण करावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सोमवारी निर्णय घेणार आहेत.

आठवी ते बारावीच्या शाळांची स्थिती

  • कोरोनामुक्‍त अंदाजित गावे : 900

  • एकूण शाळा : 1,087

  • शाळांमधील विद्यार्थी : 2,51,942

  • सध्या सुरू असलेल्या शाळा : 238

  • शाळांमधील उपस्थिती : 14,259

जिल्ह्यातील जवळपास नऊशे गावे कोरोनामुक्‍त झाली असून दहापेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या गावांमध्ये कडक निर्बंध लावून प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनामुक्‍त गावांमध्ये ऑफलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी गावनिहाय आढावा घेतील. सोमवारी त्यावर निर्णय होईल.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT