Shital Sonar Canva
सोलापूर

अमेरिकेतील शीतल सोनार उलगडणार अक्षरकलेतून पंढरीची वारी !

अमेरिकेतील शीतल सोनार उलगडणार अक्षरकलेतून पंढरीची वारी ! पाहा त्यांची कलाकृती

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

अमेरिकेत राहणाऱ्या शीतल सोनार या विठ्ठल भक्ताने अक्षरांच्या माध्यमातून यंदाची आषाढी वारी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने अक्षरवारी सुरू झाली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्रापुरता सीमित असलेला आषाढी वारीचा सोहळा (Ashadi Wari ceremony) आता सातासमुद्रापार पोचला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने परदेशी भक्तांनाही विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या (Covid-19) जागतिक महामारीच्या संकटामुळे जगभरातील विठ्ठल भक्तांच्या मनात वारीची हुरहूर कायम आहे. परदेशी भाविकांना प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नसले तरी त्यांच्यातील विठुरायाची ओढ मात्र कायम असल्याचे दिसते. (American Sheetal Sonar will given Information about Pandhari Wari through social media)

अमेरिकेत राहणाऱ्या शीतल सोनार (Shital Sonar) या विठ्ठल भक्ताने अक्षरांच्या माध्यमातून यंदाची आषाढी वारी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने अक्षरवारी सुरू झाली आहे. आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यापर्यंत त्या दररोज इन्स्टाग्राम, ट्विटर व फेसबुक यांसारख्या समाज माध्यमांवर (Social Media) विविध संतांच्या अभंगांचे सुलेखन आणि त्याला साजेशी विठुरायाची चित्रे काढून ती अपलोड करणार आहेत. त्यांच्या सुलेखनातून साकारलेली ही वारी जगभरातील विठ्ठल भक्तांना घर बसल्या पाहता येणार आहे.

शीतल सोनार या सध्या नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेतील बोस्टन शहरात वास्तव्यास आहेत. त्या मूळच्या पंढरपूरच्या आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण पंढरपुरातील पालिकेच्या शाळेत झाले. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच आषाढी वारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची विठुरायाप्रति असलेली भक्ती जवळून पाहिली आहे. पंढरीचा निरोप घेऊन अमेरिकेत वास्तव्यास गेल्यानंतरही त्यांची विठुरायाबद्दलची ओढ तूसभरही कमी झाली नाही.

सावळा विठुराया आणि भूवैकुंठ पंढरीची (Pandharpur) महती जगभर पसरली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात विठुरायाचे लाखो निस्सीम भक्त आहेत. आषाढी यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने अनेक परदेशी भक्त पंढरीच्या वाळवंटात देहभान हरवून तल्लीन होतात. शक्ती, भक्ती आणि समतेचा वारी सोहळा जगभरातील अनेक पर्यटक आणि सांस्कृतिक अभ्यासकांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे.

कोरोना संर्सगामुळे यंदाची आषाढी वारी रद्द झाली आहे. त्यामुळे शीतल यांनी अक्षरांच्या माध्यमातून आषाढीचा सोहळा उलगडण्याचा संकल्प केला आहे.

यासाठी त्या विविध संतांचे अभंग आणि त्या अभंगांना अनुसरून विठुरायाची चित्रे काढणार आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यापासून ते आषाढी एकादशीपर्यंत विविध अभंगांच्या माध्यमातून त्यांची "अक्षर वारी' समाज माध्यमातून नेटकऱ्यांना अनुभवता येणार आहे. वारीच्या काळात दररोज एका संताचा अभंग घेऊन त्यावर सुलेखन रचना आणि त्याला साजेसे विठुरायाचे चित्र त्या साकारणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्या कलात्मकतेचेही दर्शन भाविकांना घडणार आहे.

वारी हा उत्सव महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो जागतिक पातळीवर गेला आहे. कोरोनामुळे अनेक वारकऱ्यांना वारीत सहभागी होता येणार नाही. म्हणून अक्षरकला वारीच्या निमित्ताने वारीत अप्रत्यक्ष सहभागी होण्याचा संकल्प केला आहे. कुठलंही रूप रेखांकित करताना गाभा हा सर्वव्यापी असावा लागतो. कमी अक्षरांमधून मूळ स्वरूपाचा अर्थबोध व्हायला पाहिजे. परंतु, अजून हव्या तेवढ्या कलाकृती तयार झाल्या नाहीत.

- शीतल सोनार, बोस्टन, अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT