Amit Deshmukh
Amit Deshmukh Esakal
सोलापूर

"तिसऱ्या लाटेपूर्वी 12 ते 18 वयोगटासाठी लसीकरणाचा प्रयत्न !'

वेणुगोपाळ गाडी

अमित देशमुख म्हणाले, तिसऱ्या लाटेत प्रामुख्याने लहान मुलांना प्रादुर्भावाची जास्त शक्‍यता असल्याचा तर्क आहे. त्यादृष्टीने आवश्‍यक तयारी करून महाविकास आघाडी सरकार सक्षमपणे तिसऱ्या लाटेला सामोरे जाणार आहे.

सोलापूर : कोविडच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोविडच्या प्रादुर्भावाची शक्‍यता विचारात घेऊन 12 ते 18 वयोगटासाठी काही देशांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रतिबंधक लस (Covid Vaccine) देण्यात येत आहे. यास जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाल्यास केंद्राच्या परवानगीनंतर राज्यात या वयोगटासाठी लस देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (State Medical Education Minister Amit Deshmukh) यांनी आज (ता. 31) पत्रकार परिषदेत दिली. (Amit Deshmukh said the government was working to vaccinate children)

शहर-जिल्ह्यातील कोविडची स्थिती जाणून घेण्यासाठी अमित देशमुख सोलापूर दौऱ्यावर आले होते. डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये आढावा बैठक घेतल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय. सोलापूर शहर व जिल्ह्यात प्रादुर्भाव कमी झाला ही समाधानकारक बाब आहे, मात्र तिसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणा आवश्‍यक पूर्वतयारी करीत आहे. लस उपलब्ध झाल्यास जिल्ह्यात 100 दिवसांत लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याची तयारी जिल्हा प्रशासनाची आहे. तिसऱ्या लाटेत प्रामुख्याने लहान मुलांना प्रादुर्भावाची जास्त शक्‍यता असल्याचा तर्क आहे. त्यादृष्टीने आवश्‍यक तयारी करून महाविकास आघाडी सरकार सक्षमपणे तिसऱ्या लाटेला सामोरे जाणार आहे.

"सिव्हिल'मध्ये 100 बेड आरक्षित

लहान मुलांना कोविड उपचारासाठी शासकीय रुग्णालयातील 100 बेड आरक्षित ठेवण्यात येणार असून यामध्ये 256 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. खासगी रुग्णालयांमध्ये देखील लहान मुलांवर उपचाराची सोय राहणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील रिक्‍त पदांची भरती करण्यात येणार आहे. अधिष्ठाता स्तरावर पदे भरण्यात येतील. अन्य पदे परीक्षा घेऊन तसेच एमपीएससीमार्फत भरली जातील. लॉकडाउमुळे वैद्यकीत परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. आता या परीक्षा कोविड नियमांचे पालन करून घेण्याची तयारी करण्यात येत आहे, असे या वेळी देशमुख यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ महाविकास खंबीर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाविकास आघाडी सरकारने चांगल्या उपाययोजना केल्याने कोरोना लवकर नियंत्रणात आले. याविषयी महाविकास आघाडीचे कौतुक केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पातळीवर होत आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभे राहणार आहे, पण याकामी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची गरज आहे, असेही देशमुख म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB : आरसीबीच्या गोलंदाजांनी सामना आणला खेचून, प्ले ऑफच्या आशा ठेवल्या जिवंत

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT