सोलापूर

पंढरपुरात ठाकरे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके

- भारत नागणे

लॉकडाऊन काळात दूधाचे दर पडल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यातच पशुखाद्याचे दर वाढले आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : गाईच्या दुधाला 30 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रती लिटर दर मिळावा, या मागणीसाठी आज पंढरपूर-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील एकलासपूर (ता.पंढरपूर) येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन (agitation) केले. यावेळी शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून चाबकाचे फटकारे दिले. (an agitation was organized in pandharpur on behalf of rayat kranti sanghatana for milk price hike)

लॉकडाऊन काळात दूधाचे दर पडल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यातच पशुखाद्याचे दर वाढले आहेत. याचा आर्थिक फटका राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दूध दरात वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. हीच मागणी घेवून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्याध्यक्ष दिपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात दूध दरवाढ आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

आज सकाळी रयत क्रांती संघनेचे कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येत पंढरपूर -विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला सुमारे 100 लिटर दुधाचा अभिषेक घालून त्याच पुतळ्याला शेतकऱ्यांनी चाबकाचे फटके दिले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दूध दरात वाढ करावी, अशी मागणी करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सरकारचा प्रतिकारात्मक पुतळा ताब्यात घेतला. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दूध दरवाढी संदर्भातील लेखी निवेदन स्विकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संघटनेचे बबलू ताड, पांडुरंग शिंदे, अनिल गायकवाड, दाजी ताड, सचिन पाटील, दादा घाटूळ, शंकर गवळी, सावकार शिंदे, महावीर गायकवाड, सुनिल शिंदे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

दररोज दूध उत्पादक शेतकऱ्यांचे 20 कोटीचे नुकसान राज्यात दररोज गाईचे 1 कोटी 76 हजार तर म्हशीचे 25 लाख लिटर दूधाचे उत्पादन होते. दररोज सरासरी दोन कोटी लिटरचे शेतकरी उत्पादन करतात. मागील काही दिवसापासून प्रती लिटर दहा रुपयांनी दर कमी केला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे दररोज 20 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. राज्य सरकारने येत्या आठ दिवसात दूध दर वाढ जाहीर करावी, अन्यथा मुंबई व पुण्याला होणारी दूधाची वाहतूक बंद पाडू, असा इशाराही रयत क्रांतीचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे. (an agitation was organized in pandharpur on behalf of rayat kranti sanghatana for milk price hike)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT