An ancient charm to the temple of Shri Vitthal in Pandharpur 
सोलापूर

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला पुरातन मनमोहक रूप 

अभय जोशी

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाच्या संकटामुळे श्री विठुरायाचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलेले असताना मंदिरातील दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे मंदिराच्या भिंतीवरील बटबटीत ऑइलपेंट काढून टाकण्यात आल्यामुळे मंदिराचे मनमोहक पुरातन रूप दिसू लागले आहे. 
श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या बाहेरील आणि आतील भिंतींवरील रंग काढण्यात आला आहे. हे काम ठेकेदाराच्या माध्यमातून न करता काही तज्ञ आणि समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढून लाखो रुपयांची बचत करण्यात आली. पुरातत्व विभागाच्या सूचनांची दखल घेऊन ही कामे केली जात असून मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यावर मंदिराचा प्राचीन पुरातन लूक भाविकांना निश्‍चितच आनंददायी ठरणार आहे. शासनाची परवानगी मिळताच श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तीना वज्रलेप देखील केला जाणार आहे. 
श्री विठ्ठलाच्या मुर्तीच्या मागील प्रभावळ आणि सोळखांबीमधील चांदीच्या दरवाज्याला पॉलिश करण्यात आल्याने हा भाग उजळून निघाला आहे. मंदिरात जादा प्रकाश यावा आणि हवा खेळती रहावी यासाठी वातानुकूलन यंत्रणेत बदल करण्यात आला असून जुन्या लोंबकळणाऱ्या इलेक्‍ट्रिक वायर्स काढून टाकण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेत सुधारणा करण्यात आली आहे. 

एरवी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर उघडल्यापासून रात्री शेजारती होऊन मंदिर बंद करेपर्यंत भाविकांची अखंड गर्दी असते. त्यामुळे मंदिरातील देखभाल आणि अत्यावश्‍यक दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असतात. कोरोनाचा संसर्ग भाविकांना होऊ नये यासाठी 17 मार्चपासून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांच्या गर्दीमुळे फुलून जाणारे मंदिर सध्या निर्मनुष्य आहे. भाविकांची मंदिरातील ये-जा थांबलेली असल्याने मंदिर समितीने अनेक आवश्‍यक कामे हाती घेऊन ती पूर्ण केली आहेत. मंदिराच्या पुरातन स्वरूपाला धक्का न लावता पुरातत्त्व विभागाच्या सुचनेनुसार ही कामे करण्यात आली आहेत. 

बटबटीतपणा जावून मंदिराला सुंदर रूप 
मंदिर मूळ पुरातन स्वरूपात दिसावे यासाठी मंदिराच्या भिंतीवरील ऑइलपेंट काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंदिराच्या बाहेरील भिंतीवरील रंग काढून टाकत असताना मंदिराच्या आतील बाजीराव पडसाळी, श्री महालक्ष्मी मंदिर येथील भिंतीवरील रंग देखील काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे गडद रंगाच्या ऑईलपेंट मुळे आलेला बटबटीतपणा जाऊन मंदिर पुन्हा पुरातन स्वरूपाचे दिसू लागले आहे. वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा करण्यात आली आहे. सोळखांबीतील प्रकाश व्यवस्था सुधारली आहे त्यामुळे आता दिवसभर सोळखांबी मध्ये पूर्वीपेक्षा चांगला प्रकाश राहात आहे. 

लाखो रूपयांची बचत 
ठेकेदाराच्या माध्यमातून मंदिराच्या भिंतीवरील रंग काढण्याच्या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च होणार होता. परंतु मंदिर समितीने काही तज्ञांच्या मदतीने समितीच्या कामगारांना हाताशी धरून अवघ्या काही लाख रुपयात हे काम करून लाखो रुपयांची बचत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT