Grampanchayat Esakal
सोलापूर

मोहोळ नगरपरिषद, माढा, माळशिरस नगर पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती !

मोहोळ नगरपरिषद, माढा, माळशिरस नगर पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती

प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) व माळशिरस (Malshiras) नगरपंचायत आणि मोहोळ (Mohol) नगरपरिषद येथील विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत आज (शनिवार, ता. 8) पूर्ण झाली आहे. या तिन्ही ठिकाणी त्या - त्या तालुक्‍यातील प्रांत अधिकाऱ्यांची प्रशासक (Administrator) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Appointment of Administrator on Mohol Municipal Council, Madha, Malshiras Nagar Panchayat)

याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे. उद्यापासून (रविवार, ता. 9) मोहोळ नगरपरिषद, माढा व माळशिरस नगरपंचायत या ठिकाणी प्रांत अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. या तिन्ही ठिकाणच्या निवडणुका होईपर्यंत आणि निवडणुकीच्या पहिल्या सभेपर्यंत प्रशासक म्हणून प्रांत अधिकारी काम पाहणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती, लोकांचा सहभाग विचारात घेता संबंधित प्रशासकांनी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनौपचारिकरीत्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विषय समिती सभापती व गटनेते या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी. नगर परिषदेचे कामकाज सुयोग्य व लोकाभिमुख व्हावे या दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी अनौपचारिक सल्लागार समिती असावी, तसेच करण्यात येत असलेल्या उपायोजना वेळोवेळी आवश्‍यकतेनुसार पदाधिकाऱ्यांना अवगत कराव्यात. कोरोना नियंत्रणाच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांकडून सूचना मिळण्याच्या दृष्टीने प्रत्येक पंधरा दिवसांनी संबंधित पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक बैठक घ्यावी. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स व अन्य ऑनलाइनच्या माध्यमातून घेण्याबाबत प्रयत्न करावेत. बैठकीच्या वेळी मास्क तसेच आरोग्यविषयक सर्व दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT