ro ro service.jpg 
सोलापूर

मोठी बातमी ! सोलापूर ते नेलमंगला रो-रो सेवेला मान्यता 

तात्या लांडगे

सोलापूर : बेंगलुरू येथे अत्यावश्‍यक वस्तूंची वेगाने वाहतूक सुलभ होण्यासाठी रेल्वे बोर्डाने सोलापूर जिल्ह्यातील बाळे आणि बेंगलुरूमधील नेलमंगलादरम्यान रोल- ऑन- रोल ऑफ (रो-रो) सेवा सुरू करण्याच्या चाचणीस मान्यता दिली आहे. दोन ठिकाणांमधील अंतर 682 किलोमीटर इतके असून मध्य रेल्वे विभागातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. 


रो-रो सेवा मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्‍चिम रेल्वे या तिन्ही विभागात सुरु केली जाणार आहे. प्रत्येक फेरीसाठी सहा दिवस लागणार असून वाडी व धर्मावरममार्गे ही वाहतूक केली जाणार आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश सी अंगडी यांच्या संकल्पनेतून ही सेवा सुरु होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आवश्‍यक त्या राज्यांमध्ये ही सेवा पोहचविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एका मालगाडीत 43 खुल्या वॅगन असणार आहेत. मात्र, त्या गाडीच्या आकारानुसार 43 हून अधिक ट्रक किंवा लॉरी घेऊन जाता येणार आहेत. प्रति ट्रक 30 टन माल वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. प्रती ट्रक दोन हजार 700 टन भाडे म्हणून त्यावर शुल्क आकारले जाते. ड्रायव्हर आणि दुसरा एखादी व्यक्ती ट्रकच्या सोबत जाऊ शकतो. त्यांना प्रवासासाठी द्वितीय श्रेणीची तिकिटे खरेदी करावी लागणार आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) ही रो-रो सेवा सुरत्कल आणि कोलाड (मुंबईपासून 143 किमी) दरम्यान काही वर्षांपासून चालू आहे. प्रत्येक खेपेसाठी चार लाख रुपये देऊन केआरसीएलकडून भाडेतत्त्वावर एक रेक घेत आहे. या सेवेमुळे सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतकाऱ्यांसाठी जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील उद्योगाला अधिक चालना मिळेल, असा विश्‍वासही रेल्वे राज्यमंत्री सुरेश सी अंगडी यांनी व्यक्‍त केला. 


रो-रो सेवेचे फायदे 

  • रो-रो सेवेमुळे इंधनात होईल मोठी बचत 
  • पर्यावरणपूरक सेवा असल्याने प्रदूषण येईल नियंत्रणात 
  • ट्रक रेल्वेतून जाणार असल्याने रस्ते अपघातात होईल मोठी घट 
  • कमी वेळेत अधिक माल सुरक्षितपणे पोहच होणार आहे 
  • डोअर-टू-डोअर पोहचविला जाणार ट्रकद्वारे माल तथा वस्तू 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT