ro ro service.jpg 
सोलापूर

खुषखबर ! 20 एप्रिलपासून रेल्वेची रो-रो सेवा 

तात्या लांडगे

सोलापूर : बंगळरू येथे अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक वेगाने व सुलभ होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बाळे आणि बंगळरू येथील नेलमंगला दरम्यान रोल- ऑन- रोल (रो-रो) सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आता दोन्ही ठिकाणी ट्रक चढविण्यासाठी व उतरविण्यासाठी रॅम्प तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आता या सेवेला प्रत्यक्षात 20 एप्रिलनंतर सुरुवात होईल, असे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदिप हिरडे यांनी सांगितले. 

रो-रो ही सेवा मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण-पश्‍चिम रेल्वे या तीन विभागांत सुरू होणार आहे. प्रत्येक फेरीला सहा दिवस लागणार असून वाडी व धर्मावरममार्गे ही वाहतूक केली जाणार आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश सी. अंगडी यांच्या संकल्पनेतून ही सेवा सुरू होत आहे. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आवश्‍यक त्या राज्यांत ही सेवा पोचविली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका मालगाडीत 43 खुल्या वॅगन असतील. मात्र, त्या गाडीच्या आकारानुसार 43हून अधिक ट्रक किंवा लॉरी घेऊन जाता येणार आहे. प्रत्येक ट्रकला 30 टन माल वाहतुकीस परवानगी देण्यात आली असून प्रत्येक ट्रकला टनाला दोन हजार 700 रुपयांचे भाडे आकारले जाणार आहे. ट्रकसमवेत जाणाऱ्या ड्रायव्हर आणि दुसऱ्या व्यक्‍तीस प्रवासासाठी द्वितीय श्रेणीची तिकिटे खरेदी करावी लागणार आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) ही रो-रो सेवा सुरत्कल आणि कोलाड (मुंबईपासून 143 किमी) दरम्यान चालू आहे. प्रत्येक खेपेस चार लाख रुपये देऊन केआरसीएलकडून भाडेतत्त्वावर एक रेक घेण्यात आला आहे. या सेवेमुळे सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतकाऱ्यांसाठी जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. 


महत्त्वाचे मुद्दे... 

  • 43हून अधिक ट्रकची एकाचवेळी वाहतूक; रस्ते अपघातात होणार घट 
  • उद्योजक अन्‌ शेतकऱ्यांची सोय; प्रत्येक खेपला ठेकेदाराला मिळणार चार लाख रुपये 
  • कोकण रेल्वेकडून भाडेतत्त्वावर घेतला मध्य रेल्वेने एक रेक 
  • उदय पाटील यांनी घेतले कंत्राट; ट्रक मालकांनी सहभागी होण्याचे आवाहन 
  • प्रदूषण कमी अन्‌ इंधन बचतीच्या दृष्टीने प्रयोग आहे महत्त्वाचा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Water : मराठवाड्याच्या हक्काचे २५५ टीएमसी पाणी द्या; समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचे जलसंपदामंत्र्यांना दिले निवेदन

Babar Azam: बाबर आझमला सेल्फीचा इतका राग आला की... चाहत्याचा मोबाईल घेतला अन् थेट मैदानाबाहेर भिरकावला! नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

Gen Z Communication Habits: ऑनलाइन असूनही मेसेजला रिप्लाय नाही! Gen Z च्या या वागण्याचा नेमका अर्थ काय?

Latest Marathi News Live Update: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

Manwath Crime : सोशल मीडियावरील छायाचित्राच्या प्रसाराने अल्पवयीन मुलीने संपविले जीवन; मानवतमध्ये गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT