corona 
सोलापूर

सोलापुरातील हा परिसर केला प्रतिबंधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठ जवळील एका 56 वर्षीय किराणा दुकानदाराचा शनिवारी (ता.11) पहाटे 1 वाजता मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीला कोरोना झाला असल्याचे रविवारी (ता. 12) समोर आले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तेलंगी पाच्छा पेठ हा केंद्रबिंदू मानून तेथून एक किलोमीटरचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. सोलापूरचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी याबाबतचा आदेश रविवारी काढला आहे. 

या आदेशानुसार आता सोलापूर महापालिका हद्दीतील राजेंद्र चौक, कन्ना चौक, कोंतम चौक, मधला मारुती, शुक्रवार पेठ, बेगम पेठ, रंगभवन, राहुल गांधी झोपडपट्टी, पोलिस मुख्यालय, इको प्रोसेस, गुर्रम हॉस्पिटल, शांती चौक, जुना बोरामणी नाका, भुलाभाई चौक हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात येणाऱ्या चारही बाजूच्या सीमा सीलबंद करण्यात आल्या आहेत. सीलबंद क्षेत्राच्या बाहेरील एक किलोमीटर क्षेत्रापर्यंत बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. रविवारी दुपारपर्यंत कोरोना मुक्त असलेला सोलापूर जिल्हा अचानक कोरोना बाधित झाला आणि कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यूही झाला. काही तासांमध्ये सोलापूरचे वातावरण बदलल्याने सोलापूर शहरात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यू पावलेला व्यक्ती हा किराणा दुकानदार असल्याने त्याच्या संपर्कात किती लोक आले असतील? याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT