pakshi.jpg 
सोलापूर

हिरव्या माळरानांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन ; पक्षीनिरीक्षणाच्या माध्यमातून पर्यटनाची खुणावतेय संधी 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः भरपूर पावसाने हिरवीगार झालेली माळराने व दलदलीच्या भागात परिसरातील माळरानावर भारीट, गप्पीदास, युरोपियन रोलर व मॉंटेग्यू भोवत्या या विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. शहराच्या सभोवताली असणाऱ्या माळरानावरील गवत, दलदल, किडे व पक्षी या जैवसाखळीमध्ये विदेशातून येणारे पक्ष्यांचे स्थान आहे. जिल्ह्यातील माळराने, डोंगरावर उगवलेल्या गवतामुळे किटकांची झालेली वाढ या पक्ष्यांचे खाद्य असते. शेतामधील ज्वारी, बाजरी आणि मक्‍याच्या पिकांचे नुकसान करणारे टोळ व किटक हे या पक्ष्यांचा आहार आहेत. 

या विदेशी पक्ष्यांपैकी एक भारीट (ब्लॅक हेडेड बंटिंग) हा एक पक्षी होय. अत्यंत छोट्या आकाराच्या या पक्ष्यांचे थवे युरोपमार्गे उत्तर आशियातून उडत भारतात येतात. सोलापूर शहराच्या गंगेवाडी वनखात्याची जमिनीवर तसेच तेथील माळावर आता भारीट पक्षाचे आगमन झाले आहे. यावर्षी भारीट पक्षी अगदी महिनाभर आधी पोहोचले आहेत. भारीटमध्ये काळ्या डोक्‍याचा नर व राखाडी रंगाची मादी साध्या डोळ्यांनी ओळखता येते. या भारीट पक्ष्यांमध्ये लाल डोक्‍याचा व राखाडी मानेचा भारीट हे देखील असतात. 
शिकारी असलेला मॉटेग्यू भोवत्या (मॉटेग्यू हॅरीअर) वनखात्याच्या आरक्षित वनक्षेत्रावर दाखल झाला आहे. यामध्ये पांढुरक्‍या भोवत्या हा देखील दुसरा प्रकार पाहण्यास मिळतो. किटकांसोबत लहान आकाराचे पक्षी व त्याची अंडी देखील खातो. इराण, कझाकीस्तान या भागातून त्यांचे थवे दाखल होतात. उंच आकाशात ते जमीनीची टेहेळणी करीत ते भक्ष्य शोधतात. सायंकाळी माळरानावरील एखाद्या दगडावर किंवा बोरीच्या झाडावर ते वस्ती करतात. यामध्ये दलदल भोवत्या या प्रकारचा पक्षी दलदलीच्या भागात छोटे पक्षी, सरडे, टोळ, नाकतोडे व बेडुक खातो. 

लहान आकाराच्या विदेशी पक्ष्यांमध्ये गप्पीदास (कॉमन स्टोनचॅट) हा पक्षी गंगेवाडी माळारानाच्या भागात हजर झाला आहे. लहान किडे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. हिवाळी हंगामात सर्वात आधी येणाऱ्या पक्ष्यांमध्ये गप्पीदास हा पक्षी ओळखला जातो. 
युरोपियन निलपंख (युरोपियन रोलर) हा विदेशी पक्षी दाखल झाला आहे. हा देखील किटकभक्षी आहे. मात्र, त्याचा भारतात राहण्याचा कालावधी सर्वात कमी असतो. युरोपातून राजस्थान मार्गे महाराष्ट्रात दाखल होतो. हा सर्वात आधी म्हणजे डिसेंबर मध्ये परततो. हे पक्षी जोडीने पाहण्यास मिळतात. हा पक्षी हवेत जिम्नॅस्टिक पध्दतीने उलटसुलट कवायती करताना दिसतो. 

माळराने पक्षी निरिक्षणांसाठी उत्तम 
मागील पंधरवड्यापासून गंगेवाडी, वन खात्याचा परिसर, हिप्परगा, हिरस आदी भागात या वर्षी हिवाळी विदेशी पक्ष्याचे आगमन निरिक्षणात आढळले आहे. पुढील पंधरवड्यात या पक्ष्यांची संख्या वाढले व नविन प्रकारचे पक्षी पाहण्यास मिळतील. 
- ऋतुराज अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक, जुळे सोलापूर. 


भारीट पक्षी 

चिमणीपेक्षा सडपातळ 
किटक व गवताच्या बियांचे खाद्य 
शेपटी लांब व दुभागलेली 
नराचा डोक्‍यांचा रंग काळा 

युरोपियन निलपंख पक्षी 

फिकट निळसर रंग 
हवेत गिरक्‍या घेऊन किटक पकडतो 
जाड चोच व शेपूट जाडसर 

मॉटेग्यू भोवत्या पक्षी  
नराचे डोळे पिवळ्या रंगाचे 
घारीपेक्षा लहान 
नराचा रंग आकर्षक 

गप्पीदास पक्षी
लहान चोच 
चिमणीपेक्षा लहान 
शेपटी सतत हलवतो 
किटकाचे खाद्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

ENG vs SA 2nd T20 : इंग्लंडचा T20I मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला; नोंदवले एकापेक्षा सरस रेकॉर्ड

Nagpur News: रेल्वेच्या छतावर चढताच विजेचा धक्का; युवकाची प्रकृती चिंताजनक, रेल्वे स्थानकावरील घटना

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

SCROLL FOR NEXT