Solapur Municipal Corporation 
सोलापूर

सोलापूर स्मार्ट सिटी CEO अन्‌ मक्‍तेदारावर होणार कारवाई

तात्या लांडगे

सत्य परिस्थिती वेगळीच असल्याने महापौरांनी स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील व संबंधित मक्‍तेदारावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. पत्र देऊनही मक्‍तेदार व ढेंगळे-पाटील यांनी पाहणी दौऱ्याला दांडी मारली.

सोलापूर: उजनी धरणावर सोलापूर महापालिका आणि उस्मानाबाद नगरपालिकेचे पंपगृह आहेत. दोन्ही पंपगृहाच्या मध्यभागी समांतर जलवाहिनीचा जॅकवेल बसविला जात आहे. 'पोचमपाड' कंपनीला जॅकवेलची जागा पावसाळ्यापूर्वी देऊनही दोन टक्‍केच काम पूर्ण झाले आहे. शहराचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने आणि समांतर जलवाहिनीचे काम युध्दपातळीवर व्हावे म्हणून सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, सत्य परिस्थिती वेगळीच असल्याने महापौरांनी स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील व संबंधित मक्‍तेदारावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. पत्र देऊनही मक्‍तेदार व ढेंगळे-पाटील यांनी पाहणी दौऱ्याला दांडी मारली.

उजनी धरणावरून सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. पावसाळ्यात धरण काठोकाठ भरते. पाणी वाढल्यानंतर जॅकवेलच्या कामाला अडथळा येऊ नये म्हणून धरणाच्या काठावर मातीचा मोठा बंधारा टाकण्यात आला. जॅकवेलसाठी खोदाई सुरू झाली. मक्‍तेदाराच्या लोकांनी बंधारा टाकण्यात हलगर्जीपणा केला. त्यामुळे उस्मानाबाद जॅकवेलच्या बाजूने बंधाऱ्यात पाणी शिरले. सध्या बंधारा पाण्याने काठोकाठ भरल्याने खोदाईचे काम थांबले आहे. पावसाळ्यापूर्वी ज्यांना जागा देऊनही आतापर्यंत केवळ दोन टक्के काम झाले आहे.

या कामाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते रियाज खरादी, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, नागेश भोगडे, पाणी पुरवठा अधिकारी संजय धनशेट्टी यांच्या शिष्टमंडळाने उजनी धरण गाठले. त्यावेळी त्यांना कामात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले. कामाची जागा पूर्णपणे पाण्यात असतानाही स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू असल्याची खोटी माहिती दिली, असा आरोपही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. आता संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौरांचा इशारा अन्‌ आयुक्‍तांकडून कारवाईचे उत्तर

समांतर जलवाहिनीसाठी धरण परिसरातील जिथून पाणी उचलले जाते, त्याठिकाणी प्रथम जॅकवेलचे काम होणे आवश्‍यक आहे. ते काम संथगतीने सुरु असून सध्या त्या जागेत पाणी शिरल्याने मक्‍तेदारासह स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली. त्यानंतर या शिष्टमंडळाने वरवडे टोल नाक्‍याजवळील ब्रेक प्रेशर टॅंकची पाहणी केली. त्याठिकाणचे कामदेखील फेल गेल्याचे दिसून आले. त्या कामासाठीही तोच मक्‍तेदार आहे. आता मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई होईल, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT