सोलापूर

Ashadhi Wari : आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केलं मराठीत खास ट्वीट

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे.

सकाळ डिजिटल टीम

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केलं मराठीत खास ट्वीट

'सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल,' अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर विकास आराखडाबाबत चर्चा करण्याची शक्यता

मूख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. आज तर विकास आराखडाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.वारकरी केंद्रबिंदू ठेऊन पंढरपूर मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्याची शक्यता आहे. या विकास आराखड्यास ज्याचा विरोध आहे त्याची मते जाणून त्यानुसार कामाची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. मंदिराचे प्राचीन वैभव कायम ठेवत भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा यांची सांगड घालूनच हा विकास आराखडा व्हावा असे वारकऱ्यांचे मत आहे.

हजारो पालख्या पंढरपूरमध्ये दाखल; विठुनामाच्या गजरात दुमदुमली पंढरी

हजारो पालख्या पंढरपूरात दाखल झाल्या आहेत. विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली आहे. भक्तिमय वातावरणात पंढरी रंगली आहे.

'आज आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आम्ही धन्य झालो'

असा महापूजेचा मान मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. हे सर्व कर्ता करविता तो पांडुरंग आहे. आज आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आम्ही धन्य झालो. आम्हाला दोन मुलं अन् दोन मुली आहेत. आम्ही देवगड संस्थानच्या दिंडीतून पायी वारी करतो, असं मानाच्या वारकऱ्यांनी यावेळी सांगितलं. हा मान मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

आपल्या सरकारला वर्षपूर्ती होईल, पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत सुरुये - शिंदे

आपल्या सरकारला वर्षपूर्ती होईल. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत सुरु आहे. विविध योजना सुरु आहेत. आम्ही विविध प्रकारच्या योजना दिल्या. पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा आपण निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

विठ्ठलाशिवाय काहीच होऊ शकत नाही - श्रीकांत शिंदे

विठ्ठलाशिवाय काहीच होऊ शकत नाही. आम्ही कधीच विचार केला नव्हता की असं काही घडेल, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं. ते राज्यातील उठावाबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी आम्ही चुकत असलो तर सांगा, असंही ते म्हणाले.

काळे दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

मुख्यमंत्री शिंदे यांनी काळे दाम्पत्याचा सत्कार केला. लाडक्या विठ्ठलाची मूर्ती आणि वृक्ष रोप देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबाचा सन्मान केला.

वारकऱ्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणारा पहिला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे - गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज

वारकऱ्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणारा पहिला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे आहेत, असं मत गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी सहकार्य केला असल्याचे सांगितले आहे.

पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरांत पोहचवणाऱ्या स्वच्छता दिंडीचा समारोप आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये स्वच्छता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या १७ वर्षांपासून स्वच्छता दिंडी काढण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यामुळं नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक झाले आहेत. स्वच्छतेची लोकचळवळ होणं ही समाधानकारक बाब आहे, असं स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं.

मुख्यमंत्र्यांकडून रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक

विठ्ठलाची महापूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला आले आहेत. इथं मातेला दुग्धाभिषेक घालून रुक्मिणी मातेची पूजा केली.

अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान

अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान मिळाला आहे. शिवाय, मुख्यमंत्री शिंदे यांनाही दुसऱ्यांदा पूजेचा मान मिळाला आहे.

मुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात दाखल; थोड्याच वेळात होणार शासकीय महापूजेला प्रारंभ

पंढरपूर : आज आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे अनेक मंत्रीही दाखल झाले आहेत. आज पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जातील. शासकीय पूजेनंतर मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार होणार आहे, तो स्वीकारून पहाटे साडे चार वाजता विश्रामगृहाकडं निघणार आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरमध्ये दाखल झाले आहेत. पंढरपुरात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिंदे आणि विखे यांनी फुगड्याही खेळल्या. मुख्यमंत्री यांच्यासोबत शिवसेना नेते भरत गोगावले आणि आमदार शहाजीबापू पाटील हे देखील पंढरपुरात उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूरातील आज दिवसभराचा कार्यक्रम खालील प्रमाणे

मध्यरात्री ०२.२० वा.

आषाढी यात्रा २०२३- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

● स्थळ :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री क्षेत्र पंढरपूर.

सकाळी १०.१५ वा.

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम

● स्थळ :- शासकीय विश्रामगृह, पंढरपूर

सकाळी ११.०० वा.

आषाढी एकादशी निमित्त अन्नदान कार्यक्रम

● स्थळ :- तीन रस्ता, पंढरपूर

सकाळी ११.३० वा.

महाआरोग्य शिबीर

● स्थळ :- तीन रस्ता, पंढरपूर

दुपारी १२.०० वा.

कृषी प्रदर्शन

● स्थळ :- कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर

आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोप

आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा आज समारोप झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी शासनानं शेतकऱ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी केलेल्या कामांची आणि योजनांची माहिती दिली. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही महत्वाचे निर्णय घेण्यात आले याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री शिंदे सपत्नीक पंढरपुरात दाखल

राज्याचे प्रमुख ज्यांना विठ्ठलाची महापुजेचा मान असतो ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील पंढरपुरात दाखल झाले आहेत. लाखो भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. मोठ्या प्रमाणावर पंढरपूरात दाखल झालेल्या भाविकांसाठी स्वच्छ टॉयलेट्सच्या सोयीचा आढावा पंढरपुरात दाखल झाल्या झाल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला.

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्त १० लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. गुरुवारी २९ जून रोजी आषाढी एकादशीनिमित्त देशभरात उपवास, पुजा-अर्चा यांसह दर्शनासाठी राज्यभरातील विठ्ठल मंदिरं सजली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT