Ashadhi Palkhi ceremony will be held as per tradition 
सोलापूर

ब्रेकिंग! परंपरेनुसार आषाढी पालखी सोहळा निघणार

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्राचा आध्यात्मिक आणि संस्कृती  सोहळा समजल्या जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे. असे असले तरी वारकरी संप्रदायाच्या प्रथा आणि परंपरेला धरून सरकारच्या सहकार्याने यावर्षीचा आषाढी पालखी सोहळा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे प्रमुख मानकरी आणि राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी मांडली.
आषाढी पालखी सोहळा तोंडावर आला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पालखी सोहळा निघणार का या विषयी संभ्रम कायम आहे. या संदर्भात आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त  महाराज  मंडळींची आज पंढरपुरात व्हीडीओ कॉन्फरन्स बैठक  झाली.त्यामध्ये राणा महाराज वासकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेला धरून काढणे शक्य असल्याची भूमिका मांडली.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी वासकर महाराज म्हणाले आषाढी पालखी सोहळयाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा यापुढेही  कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही प्रमाणात सोहळ्यावर सावट निर्माण झाले आहे.असे असले तरी पालखी सोहळा मोठ्या थाटात आणि डामडौलात काढण्याचा आमचा विचार आहे.  सरकारकडून  जे नियम आणि अटी घालून दिल्या जातील त्या प्रमाणे आम्ही पालखी सोहळा काढू असे वासकर महाराज यांनी बैठकी नंतर  सांगितले. आषाढी एकादशी सोहळा  अवघ्या  दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. वारीच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 13 जूनला तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाचे 12 जून रोजी प्रस्थान होणार आहे. तसा पालखी सोहळा प्रमुखांनी कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. परंतु सरकारने  अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे यंदाच्या आषाढी पालखी सोहळया बाबतची उत्सकुता शिगेला पोचली आहे. याच संदर्भात राणा महाराज वासकर यांनी मांडलेल्या भूमिकेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT