Ashadhi Wari 2023 sakal
सोलापूर

Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीमुळे मोहोळ शहरात बकरी ईद दिवशी कुर्बानी नाही; मुस्लिम समाजाचा निर्णय

'तो' तसाच पुढे सुरू राहावा व एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत यासाठी आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

राजकुमार शहा

Ashadhi Wari 2023 - चालू वर्षी आषाढी एकादशी व मुस्लिम समाजाचा बकरी ईद हे दोन्ही सण गुरुवार ता 29 रोजी एकाच दिवशी आल्याने त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय झाला असल्याची माहिती मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते जिब्राईल शेख यांनी दिली.

मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम समाजातील प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. यावेळी शेख म्हणाले, मोहोळ शहरात हिंदू-मुस्लीम एकोपा कायम आहेच.

तो तसाच पुढे सुरू राहावा व एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत यासाठी आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. आम्हाला कुर्बानी साठी तीन दिवस असतात. त्यापैकी गुरुवारी फक्त नमाज पठण करावयाचे शुक्रवार व शनिवार या दिवशी तो कार्यक्रम केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात इतर ठिकाणीही मुस्लिम समाजाने अशा प्रकारचा निर्णय घेतला असल्याचे शेख यांनी सांगितले. यावेळी अशा प्रकारचा सकारात्मक निर्णय झाल्याने पोलीस निरीक्षक घुगे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी समीर शेख, अल्ताफ शेख, रशीद पठाण, अशपाक मिर्झा, जुबेर शेख, मुजमेल हुंडेकरी, अनिस कुरेशी, रफिक हरणमारे, मुजीब शेख, आधी सह अन्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT