Ashadhi Wari 2023  sakal
सोलापूर

Ashadhi Wari 2023 : आषाढी यात्रेकरिता १५ लाख प्रसाद लाडूंची निर्मिती

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मागील वर्षी प्रसाद लाडू बनविण्याचे काम खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. यावर्षी मात्र मंदिर समिती आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रसादाचे बुंदी लाडू बनवीत आहे.

राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांसाठी यंदा १५ लाख प्रसाद लाडू बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी यात्रा अवघ्या चार दिवसांवर आल्याने लाडू बनवण्याची लगबग सुरू असून दररोज सुमारे ५० हजार बुंदी लाडू तयार करण्यात येत आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मागील वर्षी प्रसाद लाडू बनविण्याचे काम खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. यावर्षी मात्र मंदिर समिती आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रसादाचे बुंदी लाडू बनवीत आहे. बुंदी लाडू तयार करण्यासाठी बेसन, साखर, डबल फिल्टर शेंगदाणा तेल, बेदाणे, काजू, वेलदोडा, जायफळ या जिन्नसांचा वापर केला जात आहे.

एक क्विंटल हरभरा डाळीसाठी दीड क्विंटल साखर वापरण्यात येत आहे. दररोज दिवस व रात्रपाळी मध्ये मिळून सुमारे ८० कर्मचारी लाडू बनवण्याचे काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज ५० हजार लाडू बनविण्यात येत आहेत.

२० आचारी बुंदी तयार करण्यासाठी, ३० महिला कर्मचारी लाडू बनवण्यासाठी तर ३० महिला कर्मचारी लाडू पॅकिंगचे काम करीत आहेत अशी माहिती प्रसाद लाडू विभाग प्रमुख राजाभाऊ राऊत यांनी दिली. पर्यावरण पूरक अशा बटर पेपरच्या पिशवीमध्ये लाडू पॅकिंग करण्यात येत आहेत.

लाडू पॅकिंग झाल्यानंतर वाहनाद्वारे ते विठ्ठल मंदिर समितीच्या लाडू केंद्रावर विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत. समितीच्या वतीने मंदिर परिसरामध्ये सुमारे तीन ते चार ठिकाणी लाडू विक्रीचे केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या लाडू विक्री केंद्रावर लाडू प्रसाद खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. बुंदीचे दोन लाडू 20 रुपयांना विक्री करण्यात येत आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणीचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूंना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT