Ashadhi Wari 2023 sakal
सोलापूर

Ashadhi Wari 2023 : पालख्यांच्या स्वागतासाठी वाखरी पालखी तळ सज्ज

देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १० जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला होता.

राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 - आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज व श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यासह मानाच्या पालख्यांचे मंगळवारी (ता.२७) वाखरी पालखी तळावर आगमन होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाखरी पालखीतळावर सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे पालख्यांच्या स्वागतासाठी पालखीतळ सज्ज झाला आहे.

आषाढी यात्रेसाठी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ११ जून रोजी तर देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १० जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला होता.

त्यांच्यासोबत मानाच्या पालख्या व राज्यभरातील दिंड्यामधील लाखो वारकऱ्यांसह प्रस्थान केले होते. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर चालत दिंडीतील वारकरी लाडक्या विठुरायाच्या ओढीने पंढरपूर कडे निघाले होते.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपान काका, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत निळोबाराय, संत रुक्मिणी माता, संत नामदेव महाराज आदी मानाच्या पालख्यांचे मंगळवारी वाखरी पालखी तळावर आगमन होणार आहे. मानाच्या पालख्या व त्या सोबतच्या दिंड्या मधून सुमारे आठ ते दहा लाख वारकरी वाखरी पालखी तळावर मुक्कामी असणार आहेत.

या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर जिल्हा परिषद, वाखरी ग्रामपंचायत, पंढरपूर पंचायत समिती व पंढरपूर नगरपरिषद यांच्यावतीने पालखीतळावर विज, पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिला वारकऱ्यांसाठी यंदा प्रथमच हिरकणी कक्ष व विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत.

याशिवाय तीनशे कायमस्वरूपी तर दीड हजार तात्पुरती स्वच्छता व स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान वाखरी पालखीतळाच्या समोरील जागेमध्ये दिंडी सोबत पायी चालत आलेल्या वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने हे शिबिर भरवण्यात आले असून या शिबिरामध्ये वारकऱ्यांची अत्याधुनिक पद्धतीने शारीरिक तपासणी व वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT