ashadhi wari pandharpur police preparation of security
ashadhi wari pandharpur police preparation of security sakal
सोलापूर

Solapur News : आषाढी यात्रेची तयारी सुरू; पोलिसांनी मागविल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : पंढरपूरच्या आषाढी यात्रेची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असून, पोलिस बंदोबस्ताबाबत भाविकांसह नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेला राज्यासह शेजारची राज्य व देशभरातून १० लाखांहून अधिक भाविक येतात. भाविकांसह वाहनांच्या गर्दीचे नियंत्रण करावे लागते. यंदा १७ जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी यात्रा काळातच मोहरमही आहे.

त्यामुळे गावागावासह पंढरपूर यात्रेतील बंदोबस्तामुळे ग्रामीण पोलिसांवर ताण येणार आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक देशपांडे म्हणाले, पंढरपुरातील आषाढी व कार्तिकी या दोन मोठ्या यात्रा आहेत. आषाढी यात्रेची तयारी सुरू झाली आहे.

भाविकांना सुलभरीत्या विठ्ठलाचे दर्शन घडावे, कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, यासाठी ग्रामीण पोलिस दलाचा सतत प्रयत्न राहिला आहे. तशाप्रकारे यंदाही नियोजन केले जात आहे. मात्र, गर्दीचे नियंत्रण आणखी चांगल्या प्रकारे व्हावे, यासाठी भाविकांसह नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत.

गतवर्षी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अंमलदारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. महाद्वारात चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सुरक्षा कठडे उभारण्याचे चांगल्या प्रकारे नियोजन केले. परिणामी भाविकांना कोणताही त्रास झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या ई मेलवर पाठवा सूचना

पंढरपूरला आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे भाविक व वाहनांच्या गर्दीचे अधिक उत्तम पद्धतीने नियोजन व्हावे, यासाठी ग्रामीण पोलिस दल प्रयत्नशील आहे. त्यासाठी भाविकांसह नागरिकांनी त्यासंदर्भात waribandobast@gmail.com या ई मेलवर सूचना पाठवाव्यात. त्यांचा पोलिस बंदोबस्त करताना विचार केला जाईल.

निवडणुकांचीही प्रशासकीय तयारी सुरू

फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी सुरू झाल्याचे पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT