wari.jpg 
सोलापूर

चिंता करु नका आषाढी वारीतील येथे पाहता येणार "हे' क्षण

सकाळ वृत्तसेवा

नातेपुते (सोलापूर) : यंदा कोरोनाचे महासंकट कोसळल्याने आषाढी पायी दिंडी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. जगभरातील वैष्णवांना वारीचा घरबसल्या आनंद घेता यावा, या हेतूने श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, श्री क्षेत्र आळंदी व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील नामवंत तरुण प्रवचनकारांचे श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथावर निरूपण आयोजित केले आहे. हे निरूपण जगभरातील वैष्णवांना फेसबुक लाइव्हद्वारे पाहता व ऐकता येणार आहे. 
आषाढी वारी म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असा सोहळा. संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव आदी संतांसमवेत आषाढी पायी वारीत सहभागी होऊन वारीचा आनंद घ्यायचा ही प्रत्येक वैष्णवाची इच्छा असते. महाराष्ट्रासह अन्य प्रांतातून व परदेशातून लाखो भाविक संतांसमवेत टाळ-मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपुरात येतात. पवित्र चंद्रभागेचे स्नान करून विठुरायाचे दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणेनंतर आनंदाने गावाकडे जातात. शेकडो वर्षांची ही परंपरा यावर्षी करोनाच्या जागतिक संकटाने मोडते की काय? वारीच्या आनंदापासून आम्ही दूर जातो की काय? अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु, श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाने जगभरातील वैष्णवांना आषाढी वारीत पायी चालायला मिळणार नसले तरी घरात बसून मनाने वारीत बरोबर राहण्यासाठी श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथावर निरूपण हा उपक्रम हाती घेतला आहे. श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथ निरूपण पालखी सोहळा पत्रकार संघाच्या https://m.facebook.com/palkhisohalapatrakarsangh या फेसबुक पेजवर शनिवारपासून (ता. 13) माउलींचा प्रस्थान सोहळा ते बुधवारी (1 जुलै) आषाढी एकादशी असे 19 दिवस दररोज सायंकाळी 4 ते 5 या वेळेत लाइव्ह केले जाणार आहे. या श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथ निरूपण सोहळ्यात राज्यातील नामवंत तरुण कीर्तनकारांच्या अमृतवाणीतून दररोज एका अध्यायावर निरूपण करण्यात येणार आहे. श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथ निरूपण ऐकण्याची तसेच दररोज वारीतील क्षणचित्रे पाहण्याची संधीही या फेसबुक पेजवरून उपलब्ध करणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी सांगितले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election: बंडखोरी टाळण्यासाठीचा डाव भाजपवरच कसा उलटला? पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं? ‘राष्ट्रवादीं’ची आघाडी यशस्वी?

8th Pay Commission : आठवा वेतन आजपासून लागू,सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या

सनी देओलच्या प्रेमात वेडी होती एका सुपरस्टारची सासू, दुसऱ्याशी लग्न केल पण, इकडे सनीसोबत गुपचूप प्रेमसंबंध चालूच!

PCMC Election : शत्रुघ्न काटे-नाना काटे यांच्यात ‘नुरा कुस्ती’! सामंजस्याचे राजकारण असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Saturn 2026: ‘या’ राशींवर शनिची विशेष कृपा, करिअर-पैशात होणार मोठी प्रगती

SCROLL FOR NEXT