Vaalu Mafiya 
सोलापूर

धक्कादायक : वाळू माफियांकडून तहसीलदारावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : वाळू चोरी करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला तहसीलदारांच्या आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर चारचाकी वाहन घालून, त्यांना दुखापत करून जिवाला धोका करण्याचा प्रयत्न झाला. पथकातील कर्मचाऱ्यास आरोपींनी शिवीगाळ केली. या प्रकरणी तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की 21 जुलै रोजी येथील सांगोला जॅकवेलजवळील भीमा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करून चोरी सुरू असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना मिळाली. त्यानंतर त्या तातडीने त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचल्या. चंद्रभागा नदीपात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन करून बिगर क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनामधून वाळू घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. त्या वाळू चोरांना अडवण्याचा प्रयत्न तहसीलदार डॉ. वाघमारे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केला. तेव्हा आरोपी अण्णा पवार, ग्यानबा धोत्रे आणि भैय्या ऊर्फ प्रकाश गंगथडे यांनी शासकीय कामात अडथळा आणून तहसीलदार डॉ. वाघमारे आणि त्यांच्या सोबतच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहने घालून त्यांना दुखापत करण्याचा व जिवाला धोका होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पथकातील प्रशांत शिंदे यांना ढकलून देऊन दमदाटी केली. 

सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या दोन पांढऱ्या रंगाच्या बिगर नंबरच्या चारचाकी वाहनांमधून शासनाच्या मालकीची सुमारे 12 हजार रुपये किमतीची गौण खनिज वाळू चोरून नेली. या प्रकरणी तहसीलदार डॉ. वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड पुढील तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT