Baba Kusurkar
Baba Kusurkar 
सोलापूर

बाबा कुसूरकरांच्या विशेषांकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन 

सकाळवृत्तसेवा

द. सोलापूर ः सोलापूरचे दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते प्र. गो. तथा बाबा कुसूरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तच्या विशेषांकासाठी बाबांचे स्मृतीपर लेख, छायाचित्रे व आठवणी येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत पाठवण्याचे आवाहन विशेषांक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 
सोलापूरच्या राजकीय, सामाजिक, उद्योग आणि कामगार क्षेत्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा कुसुरकर यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत बाबा कुसुरकर यांच्या 23 व्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी "कै. साथी बाबा कुसुरकर जन्मशताब्दी विशेषांक समिती'ची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा विशेषांकाचे प्रधान संपादक आहेत तर दत्ता गायकवाड कार्यकारी संपादक आहेत. संजीव कुसुरकर सचिव आहेत. या विशेषांकासाठी बाबांचे स्मृतीपर लेख, छायाचित्रे व आठवणी द्वारा- दत्ता गायकवाड, ऋतुचित्र,8371 रेल्वे लाईन्स, सोलापूर 423001 या पत्त्यावर तसेच 7588266710 व 9975626710 या भ्रमणध्वनीवर व्हॉटसऍपवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत बाबांच्याविषयी बोलताना अनेकांनी मनोगत मांडले. सोलापूरचे जुनी गिरणी टाळेतोड आंदोलन, एन. जी. मिल सत्याग्रह, महापालिका कामगार युनियन, उजनी धरण बाधितांचे पुनर्वसन, सोलापूर पाणी समस्या, 1972 चा रेल्वे संप अशा अनेक आंदोलनात बाबांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. महाजन कमीशन समोर बाबांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण साक्षीने सोलापूर महाराष्ट्र प्रांतात राहण्यासाठी आग्रही भूमिका मांडली गेली. बाबांनी होटगीरोड औद्योगिक वसाहतीच्या उभारणीत आणि जडणघडणीत निर्लोभ योगदान दिले असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT