Pola
Pola 
सोलापूर

पोळा सणाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत विविध साहित्य विक्रीस; परंतु कोरोनाच्या सावटामुळे रेलचेलच नाही 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैलपोळ्याच्या सणानिमित्त सर्जा-राजाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारात विक्रीसाठी आले आहेत. साधारणपणे गतवर्षी एवढ्याच साहित्याच्या किमती आहेत. मात्र ग्रामीण भागात गडद होत असलेल्या कोरोनाच्या सावटाखाली बाजारात या साहित्याची खरेदी करणाऱ्यांची फारशी रेलचेल दिसत नाही. 

वर्षभर शेतात काम करणाऱ्या सर्जा-राजांना सजवत पूजन करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे महत्त्व पोळ्याला आहे. शेतकरी हा सण उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. बैलांना सजवून वाजत-गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. त्याचा परिणाम बैलपोळा सण साजरा करण्यावर दिसून येणार असल्याचे चित्र आहे. शेतकरी राजा मात्र आपल्या सर्जा-राजाचा सण मोठ्या वाजत-गाजत का नसेना मात्र उत्साहात रुढी-परंपरेने साजरा करतोच. 
कुर्डुवाडी शहराजवळील 20 ते 25 खेड्यांतील शेतकरी शहरात बैलपोळा सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. अवघ्या चार-पाच दिवसांवर पोळा आला तरी बाजारात म्हणावी तशी ग्राहकांची रेलचेल दिसत नाही. विक्रेत्यांना देखील कोरोनाचा परिणाम प्रकर्षाने जाणवत आहे. 

अरण येथील रहिवासी असलेले पोळ्याचे साहित्य विक्रेते बळिराम खंडाळे म्हणाले, या प्रकारच्या साहित्य विक्रीचा हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कोरोनाच्या आधी आम्ही आठवडी बाजारात सुमारे चार ते पाच हजार रुपयांच्या साहित्याची विक्री तर सणाच्या बाजाराला 20 ते 25 हजार रुपयांच्या साहित्याची विक्री करत होतो. परंतु यंदा कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी आठवडी बाजार बंद झाले. काही ठिकाणी बाजारात विक्री करता येत नाही. त्यामुळे बाजारात दीड ते दोन हजारांची विक्री होत आहे. सण काही दिवसांवर आला तरी अजून म्हणावी तेवढी विक्री होत नाही. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी साहित्याच्या किमतीत किरकोळ वगळता फारशी वाढ झाली नाही. 

साहित्य व किमती 
रेशीम 120 रुपये किलो, म्होरके 50 रुपये प्रतिनग, टायगर 160 रुपये किलो, गोप 300 रुपये किलो, कासरा 30 रुपये प्रतिनग, गोंडे 100 रुपये जोडी, कवडी माळ 100 रुपये जोडी, बकरी पट्टा 50 रुपये जोडी, घोगाळ 200 रुपये जोडी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT