The backdrop of Solapur with a very cautious troubling line of action 
सोलापूर

सोलापूरच्या पार्श्वभूमीवर मोहोळ सतर्क; कारवाईचा आवळला फास 

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका सतर्क झाला असून आज सकाळपासून मोकाट फिरणाऱ्याची व शहरात येणाऱ्यांची शिवाजी चौकात पोलिसांनी धुलाई केली जात आहे. वाहतूक शाखेने सुमारे 70 मोटरसायकलस्वारांवर कारवाई करून मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत. 
मोहोळ हा सोलापूरपासून सर्वात जवळचा तालुका आहे. त्यामुळे सोलापूरहून नागरिकांची ये-जा सुरू असते. शहरात येणारा मुख्य रस्ता सील केला आहे, तर चोरवाट्या बंद केल्या आहेत. शहरात पोलिसांसह कमांडोंची फिरती गस्त सुरू आहे. त्यामुळे मोकाटांची पाळताभुई थोडी झाली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. 
तहसीलदार जीवन बनसोडे व पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, आज दुपारी एक वाजता प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी मोहोळला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे स्वतः मोबाईल व्हॅनमधून ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहेत. दरम्यान, तहसीलदार जीवन बनसोडे यांनी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोहोळला न येण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asif Ali Zardari: ‘आम्हाला बंकरमध्ये लपावं लागलं...’ ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या अध्यक्षांची कबुली; काय म्हणाले?

Type-C Port Uses : मोबाईलचा Type-C पोर्ट फक्त चार्जिंगसाठी नाही; 'हे' आहेत 10 भन्नाट उपयोग, 99 टक्के लोकांना आजही नाही माहिती

Dinesh Karthik : ...मग भारताविरुद्ध गळा का काढता? दिनेश कार्तिक आणि इंग्लंडच्या पीटरसनचा सवाल

Dr. Neelam Gorhe : शिवसेना २५ जागांवर ठाम; वरिष्ठ स्तरावरून निर्णय होणार

Cold And Flu Myth: ओल्या केसांनी थंडीत बाहेर गेल्यास सर्दी होते का? वाचा डॉक्टरांचे मत

SCROLL FOR NEXT