BPL cricket spardha.jpg
BPL cricket spardha.jpg 
सोलापूर

बाळे प्रिमीअर लिग डीएस टायगरने जिंकली : रोहन ढेपे सवोत्कृष्ट खेळाडू 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः बाळे येथे आयोजित बीपीएल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद डीएस टायगर संघाने मिळवले आहे. या संघाने केडी रायर्डस संघावर पाच गड्यांनी मात करून हे विजेतेपद मिळवले. 

बाळे गावातील खेळाडूंसाठी बीपीएल अर्थात बाळे प्रीमियर लीग ही स्पर्धा डोणगाव क्रिडा मैदानावर आयोजित केली होते. या स्पर्धेमध्ये एकूण 60 खेळाडूंनी सहभाग 4 संघाच्या माध्यमातून घेतला होता. अंतिम सामना के.डी. रायडर्स व डी.एस. टायगर या संघामध्ये झाला. 
अंतिम सामन्यात डीएस टायगर ने नाणेफेक जिंकून केडी रायडरला फलंदाजीचे निमंत्रण दिले. त्यामध्ये केडी रायडर्सने सात षटकात 37 धावा केल्या. डीएस टायगरने हे धावाचे आव्हान केवळ पाच षटकात पूर्ण केले. अंतिम सामना चा सामनावीर पुरस्कार रोहन ढेपे यांना मिळाला. त्यांनी अष्टपैलू कामगिरी करत 9 चेंडू मध्ये21 धावा केल्या व दोन षटकात सहा धावा देत दोन बळी मिळवले. 
डीएस टायगर संघाने अंतिम विजेतेपद पटकावून चषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रिकेट पंच सोन्याबापु भोसले, गोपाळ दळवी, बाबाराज भोसले, नागेश कोकरे, अमित माने व अमर भवर यांनी सहकार्य केले. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना दीपक भाऊ सुरवसे यांच्याकडून मोफत टीशर्ट देण्यात आले. 

रोहन ढेपेची कामगिरी 
रोहन ढेपे या खेळाडूने या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी, व मालिका वीर ही बक्षिसे जिंकली. तसेच तीन सामन्याचे सामनावीर बक्षिस मिळवले. एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षिसे मिळवणारा तो एकमेव खेळाडू ठरला.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT