ढगाळ हवामान आणि अवकाळीमुळे बळीराजा संकटात sakal
सोलापूर

वाळूज : ढगाळ हवामान आणि अवकाळीमुळे बळीराजा संकटात

द्राक्ष , तूर , हरभरा पिकांवर रोगराईची भिती

सकाळ वृत्तसेवा

वाळूज : ढगाळ हवामानामुळे बळीराजाच्या शेतातील पिके आणि फळबागा पुन्हा संकटात सापडत असून ढगाळ हवामान आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष, तूर, हरभरा या पिकांसह फळभाज्या व पालेभाज्यांवर मावा, तुडतुडे, मिलिबग, कीड, अळी यासह रोगराई पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व जिल्हा कृषी हवामान केंद्र व कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ (सोलापूर) यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १६ ते १७ नोव्हेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्‍यता असल्याचा इशारा जिल्हा कृषी हवामान केंद्र व कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ यांनी दिला आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका, कांदा याबरोबरच पालेभाज्या, फळभाज्या तसेच द्राक्ष, पेरु, डाळिंब, सिताफळ, पपई या फळबागासह पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील पिकांत गुडघ्या मांड्याएवढे पाणी साठल्याने पिके सडून गेली. खरीप हंगाम वाया गेला असतानाच रबी हंगामातील ज्वारी, हरभरा यासह विविध पिके चांगली आली असताना पुन्हा हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता वर्तविल्याने जिल्ह्यातील बळीराजापुढे अवकाळीचे संकट उभा ठाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: एफडीएच्या कारवाईचा धसका! सीसीआयच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित; मुंबईतील इतर क्लबसह जिमखाना प्रशासने सतर्क

Consumer Awareness: जाहिरातींवर ७.४८ कोटी खर्चाचा आराखडा; ग्राहक संघटनांना बगल देण्यावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा तीव्र निषेध

Crime News: टीव्ही पाहताना चुकून चॅनेल बदललं; पत्नीला संताप अनावर, विळा उचलला अन्... पतीसोबत धक्कादायक कृत्य घडलं

Astrology: १८ सप्टेंबरपर्यंत ग्रहांचा मोठा खेळ; 'या' राशींवर होणार पैशांचा आणि यशाचा वर्षाव!

Latest Marathi News Live Update : २३ व्या फेरीनंतर प्रशांत किशोर १३२६९ मतांनी आघाडीवर, विजय जवळपास निश्चित

SCROLL FOR NEXT