आमदार राऊत यांच्या अंगावर केमिकल टाकण्याचा प्रयत्न sakal
सोलापूर

बार्शी : आमदार राऊत यांच्या अंगावर केमिकल टाकण्याचा प्रयत्न

महिलेने केमिकलची बाटली उघडून ते केमिकल त्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला.

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : शहरातील भगवंत मैदानाच्या नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार राजेंद्र राऊत कार्यक्रमस्थळी येत असताना एका महिलेने केमिकलची बाटली उघडून ते केमिकल त्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच सोबतच्या दोघांनी स्वीय सहायकास मारहाण केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

संजीवनी बारंगुळे, संतोष बारंगुळे, ओमकार पिंपळे (तिघे रा. नागोबाचीवाडी), बालाजी डोईफोडे (रा. उपळाई रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आमदार राऊत यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत खराडे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. येथील भगवंत मैदान नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी उपस्थित राहणार होते. त्यासाठी आमदार राजेंद्र राऊत कार्यक्रमस्थळी येत होते. आमचे नेते राजेंद्र मिरगणे यांच्या बांधकाम प्रकल्पाबाबत तक्रारी का करता, असे म्हणत बारंगुळे यांनी बाटली उघडून त्यातील केमिकल आमदार राऊत यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला.

विरोध करताना केमिकल जमिनीवर सांडले तर इतर दोन व्यक्ती लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत होते. त्यावेळी संदेश काकडे, दीपक राऊत, पाचू उघडे, अमोल चव्हाण यांच्यासह इतर लोक येत असल्याचे पाहून ते तिघेजण पळून जात होते. त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यावेळी एकाच्या खिशातील मोबाईलवर फोन आला. तो फोन दीपक राऊत यांनी उचलला. त्या फोनमध्ये समोरुन मी राजेंद्र मिरगणे बोलतोय, तुम्ही राजा राऊताच्या अंगावर ऍसिड टाकले का नाही? अशी विचारणा केली. त्यावरुन मिरगणे यांच्या सांगण्यावरुन हा प्रकार घडला असून प्राणघातक हल्ल्याची सुपारी दिली, याची खात्री झाली असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT