Dr. Kulkarni
Dr. Kulkarni Canva
सोलापूर

कोव्हिडमुक्तीसाठी एसडब्ल्यू थेरपी ठरू शकते प्रभावी ! बार्शीच्या संशोधकाने शोधली नवी थेरपी

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : सध्याच्या कोरोना महामारीत असंख्य रुग्णांचे प्राण ऑक्‍सिजन (Oxygen) अभावी संकटात आले आहेत. याचे मूळ कारण म्हणजे कोरोना व्हायरसमुळे (Covid-19) होणारी फुफ्फुसाची हानी (Lung damage) व त्यामुळे निर्माण होणारा शरीरातील ऑक्‍सिजनचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत एसडब्ल्यू थेरपीचा (SW Therapy) वापर केल्याने रुग्णाचे प्राण वाचवता येतील व इतर सहवेदनांमुळे होणाऱ्या त्रासाची तीव्रताही कमी होऊन त्यातून रुग्णांची मुक्तता होऊ शकते, असे मत झाडबुके महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्राचे संशोधक डॉ. सुहास कुलकर्णी (Researcher of microbiology Dr. Suhas Kulkarni) यांनी व्यक्त केले आहे. (Barshi's researcher has researched SW therapy for covid relief)

एसडब्ल्यू थेरपी म्हणजे सॅच्युरेटेड वॉटर थेरपी होय. या थेरपीमध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा पाण्यामार्फत पोटातून करता येईल. एअरेटरचा (एअरपंप फिशपॉंडमध्ये वापरतात) वापर करून अतिथंड पाण्यात हवा सोडून त्यातील ऑक्‍सिजन विरघळवता येतो. एक लिटर पाणी सॅच्युरेटेड करण्याकरिता फक्त एक तास लागतो. या पद्धतीने बारा मिलिग्रॅम प्रतिलिटरपर्यंत ऑक्‍सिजन पाण्यात विरघळवता येतो. त्याचे वास्तविक नैसर्गिक पद्धतीने साध्या पाण्यात हेच प्रमाण फक्त पाच ते सहा मिलिग्रॅम प्रतिलिटर एवढेच असते.

अशाप्रकारे तयार केलेले 500 ते 800 मिलिलिटर सॅच्युरेटेड वॉटर पिण्यायोग्य थंड असताना रुग्णाला प्यायला द्यायचे आहे. पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचे असून पिल्यानंतर पुढील एक ते दीड तास कुठल्याच प्रकारचा व्यायाम अथवा श्रम करायचे नाही.

या काळात पाण्याचे शोषण लहान आतड्यांमधील पेशींमध्ये व रक्तामध्ये निष्क्रिय शोषण (पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन) या पद्धतीने होते. त्यामुळे साहजिकच रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढते. ऑक्‍सिजन पाण्यात जरी कमी प्रमाणात विरघळत असला व रक्तात त्या प्रमाणात पाठवला जात असला तरी शरीरातील ऑक्‍सिजन तुटवड्याच्या परिस्थितीत ते प्रमाण मोलाचे ठरते.

शरीरात अशा प्रकारे पोटातून ऑक्‍सिजनचा पुरवठा केल्यामुळे फुफ्फुसाकडून होणाऱ्या ऑक्‍सिजन पुरवठ्याची मागणी कमी होते व त्यामुळे फुफ्फुसाला थोडी का होईना विश्रांती मिळते. याचा फायदा म्हणजे रुग्णाला आलेला थकवा कमी होण्याची शक्‍यता बळावते.

रुग्णाने या सॅच्युरेटेड थेरपीचा वापर केल्याने लहान आतड्यांतील पेशी अतिकार्यक्षम होऊन पोटातील इतर विकाराच्या त्रासातून देखील रुग्णाची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्‍यता वाढते. सॅच्युरेटेड वॉटर थेरपीचे दुष्परिणाम नसल्याने पोस्ट कोव्हिड तसेच घरीच क्वारंटाइन असलेल्या रुग्णांसाठी ही थेरपी प्रभावी ठरू शकते, असे प्रा. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत डॉ. सुहास कुलकर्णी?

संशोधक डॉ. सुहास कुलकर्णी हे सूक्ष्मजीवशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक असून, श्रीमान झाडबुके महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख होते. मायक्रोबायॉलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. मराठी विज्ञान परिषद, शाखा बार्शीचे उपाध्यक्ष आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT