Restricted area
Restricted area 
सोलापूर

बार्शीचा सुधारित चौदा दिवसांचा प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश तत्काळ रद्द करा ! कोणी केली मागणी? वाचा 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहरातील प्रमुख बाजारपेठेसह रहिवाशी भाग सुधारित प्रतिबंधित क्षेत्र आदेशाने चौदा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा, अमानवी आणि नागरिकांची मुस्कटदाबी करणारा आहे. हा आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

श्री. अक्कलकोटे म्हणाले, शहरात 17 जुलैपासून सुरवातीला दहा दिवसांचा लॉकडाउन करण्यात आलीा. त्यानंतर पुन्हा पाच दिवसांचा लॉकडाउन आणि आता परत चौदा दिवसांचा सुधारित प्रतिबंधित क्षेत्र आदेश म्हणजे प्रचंड संतापदायक आहे. एकीकडे पुन्हा लॉकडाउन करणार नाही म्हणायचे आणि दुसरीकडे असे चुकीचे आदेश काढून नागरिकांना वेठीस धरायचे, हे कदापि सहन केले जाणार नाही. हा आदेश म्हणजे नागरिक व व्यापारी यांच्या सहनशीलतेचा प्रशासन अंत पाहतेय. लोकभावना जपावी. 
सुधारित प्रतिबंधित क्षेत्र आदेशामुळे भोसले चौक ते तुळशीराम रोड, सोमवार पेठ, तेथून गवत गल्ली ते तेलगिरणी चौक असा संपूर्ण परिसर सील होणार आहे. 
दहा दिवसांचा लॉकडाउन संपण्यापूर्वी नगरपालिका येथे व्यापारी व लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत किराणा दुकानेही अत्यावश्‍यक सेवा म्हणून पाच दिवसांच्या लॉकडाउन काळात काही वेळ निश्‍चित करून चालू ठेवण्याचे ठरलेले असताना, आदेशात मात्र त्याचा उल्लेख करण्यात आला नाही. 

प्रशासन कोरोना विषाणूला आटोक्‍यात आणण्यासाठी काम करत असताना विनाकारण सामान्य नागरिकांना किती दिवस आणि कशासाठी वेठीस धरणार आहे? बार्शी शहरात 4 जूनला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण वाणी प्लॉट भागात मिळाला. त्याचा बाधित होण्याचा स्रोत जामगाव येथील बाधित रुग्ण संपर्कात होता. बोगस डॉक्‍टरमुळे शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील अनेक बाधित रुग्णसंख्येत वाढ होत गेली. यादरम्यान तालुका आरोग्य विभागाने मनमानी पद्धतीने, बेकायदेशीर व दबावाखाली काम करण्याची कार्यपद्धती कारणीभूत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

याबाबत प्रांताधिकारी हेमंत निकम म्हणाले, सद्य:स्थितीत कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात रोग नियंत्रण अधिनियमानुसार व जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार सुधारित प्रतिबंधित क्षेत्र करणे आवश्‍यक आहे. रुग्ण सापडत आहेत त्याच ठिकाणी मर्यादित जागेपुरतेच प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT