sbi yono user sakal
सोलापूर

SBI Yono User : सावधान एसबीआय योनो युजर असाल तर तुमची फसवणूक होऊ शकते

एसबीआय योनो ट्रांजेक्शन रिवार्ड्स क्लेमच्या (रिडीम) करण्यात होऊ शकते बँकेचे खाते रिकामे

सकाळ वृत्तसेवा

येरमाळा - बँका नेहमीच फसवणूक टाळण्याकरिता आपला एटीएम कार्ड नंबर, पिन, खाते क्रमांक, ओटिपी कोणालाही सांगू नका. बँक अथवा आमचे कोणतेही प्रतिनिधी आपणास याबाबत विचारणा करत नाहीत. अशा मॅसेज मुळे बँकेचे खातेदार हुशार झाल्याने ऑनलाईन चोर ही नवनवीन पद्धतीने युक्ती लढवून लोकांच्या बँक खात्यातील पैशाची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत.

आज पर्यंत पाहिलेल्या प्रकारात तुम्हाला ऑनलाईन लॉटरी लागली म्हणून केबीसीची लॉटरी लागली म्हणून खात्याची माहिती घेऊन खातेदारांनी लूट केली जात होती. आता भारतीय स्टेट बँकेच्या विश्वासार्ह एसबीआय योनोच्या खात्यावरील ट्रांजेकशनचे रीवॉर्ड क्लेम (रिडीम) करा म्हणून मॅसेज येत आहेत.त्यातून तुमचे बँकेतील खाते रिकामे होऊ शकते.

तुमला आलेल्या अशा मॅसेज मधील लिंक क्लिक करताच तुम्हाला स्क्रीनवर एसबीआय योनो पेज येईल वरती पहिल्या स्टेपला युजर आयडी, पासवर्ड, मोबाईल नंबर आणि कॅप्चा मागीतला जातो,

  • दुसऱ्या स्टेपला मोबाईल नंबर इमेज कॅप्चा मागीतला जातो,

  • तीसऱ्या स्टेपला आलेला ओटीपी,

  • चौथ्या स्टेपला प्रोफाईल पासवर्ड, जन्मतारीख लॉगिन करा,

  • पुन्हा तोच आलेला ओटीपी,

  • शेवटच्या स्टेपला बँक खात्याचे शेवटचे चार अंक आणि पॅनकार्ड नंबर आणि हे तुम्ही भरले की बँकेचे खाते क्षणार्धात मोकळे केले जाते.

अशा प्रकारे येत आहेत फसवणुकीचे मॅसेज.

Dear Customer Your YONOSBl REWARD Rs.8550/ will expire today so please COLLECT http://bitly.ws/3hsWM ,special for you .real estate coin

भारतीय स्टेट बँकेच्या अत्यंत सुरक्षित, आणि फसवणूक न होणाऱ्या योनो एसबीआय ऑनलाईन, नेट बँकिंग ॲपच्या ट्रांजेक्शन रीवार्ड्स क्लेम करा म्हणून मॅसेज येतो. आणि खातेदारांची फसवणूक होत आहे हे एक भारतीय स्टेट बँक प्रशासना पुढील नवे आव्हान म्हणावे लागेल.

तुम्ही या मॅसेज कडे दुर्लक्ष केले तरी हा मॅसेज दररोज येईल शेवटचा दिवस आजच तुमचे रिवार्ड्स क्लेम करा म्हणून CP - REACON या मॅसेज सेंटर वरुन हा मॅसेज येतो तुम्ही ऑनलाईन प्रोसेस मध्ये एंट्री केली येणारे ओटीपी BY - SBIINB सेंटर वरुन मॅसेज येतात त्यामुळे खातेदार विश्वासाने ऑनलाईन लुटीचे शिकार होतात. विशेष म्हणजे या सेंटर वरुन आलेला ओटीपी कितीही दिवस चालतो. सतत मॅसेज येतच राहतात आणि बँक खातेदार बळी पडतात.

योनो रीवार्ड म्हणजे काय....

योनो एसबीआय नेट बँकिंग,मोबाईल बँकिंग ऑनलाईन डिजिटल व्यवहारात वापरले जाणारे ॲप तुमच्या खात्यावरील व्यवहाराच्या ट्रांजेक्शन वर मिळणारे पॉइंट असतात. या पॉईंटच्या मध्यांतून मोबाईल,डिश,फास्टटॅग,रिचार्ज ऑनलाईन शॉपिंग करु शकतो.

बहुतांश व्यवसायिक बँकेत जाऊन रांगेत वेळ घालवण्या एवजी या ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

हा एसबीआय योनो रिवार्ड्स क्लेम करा म्हणून येणारा मॅसेज खरा आहे की फेक याची खात्री करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केली असता त्यांनी हा मॅसेज फेक असल्याचे सांगत एसबीआय योनो ॲप मध्ये रीवार्ड असतात ते तुम्ही ॲपच्या सर्व्हिसेस ऑप्शन मधून तुम्ही सहज हवे तेव्हा क्लेम (रिडीम) करु शकता. या फेक मॅसेज मध्ये रिवार्ड्स शब्द आहे आणि बँकेच्या ॲप मध्ये रिवार्ड शब्द आहे.

हा फरक आहे तो खातेदारांनी ओळखावा.रीवार्ड क्लेमसाठी बँके मॅसेज करत नाही. शाखा व्यवस्थापक शरद वाठोरे भारतीय स्टेट बँक येरमाळा. यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT