katraj.jpg 
सोलापूर

सावधान ! सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यात बिबट्याचा वावर

संतोष केसकर

जिंती(सोलापूर)ः कात्रज (ता.करमाळा) येथील शिवारात वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृष्य प्राण्याने एक शेळी फस्त केली असुन या घटनेमुळे कात्रज परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

गेल्या काही दिवसामध्ये जिल्ह्यातील काही भागात बिबट्‌या सदृष्य प्राण्याचा वावर असल्याच्या घटना घडत आहे. अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ आढळतात. बिबट्याचा वावर हा फक्त अन्न व पाण्याच्या शोधात होत आहे. अशाच प्रकारची घटना आता कात्रज परिसरात घडली आहे. 

कात्रज येथील महेश लकडे यांची शेळी बुधवारी (ता.5) सायंकाळी बिबट्याने फस्त केली आहे. लकडे यांच्या घरापासुन पाचशे फुट अंतरावर रोहित अण्णासाहेब लकडे हा मुलगा शेळ्या चारत होता. त्याला अचानक एक बिबट्या सदृष्य प्राणी दिसला. त्या बिबट्याने एका शेळीवर हल्ला करुन शेळी ऊसात घेवुन गेला. सदरचा मुलग हि घटना पाहुन घाबरुन घरी पळत आला. हि हकिगत चुलते महेश लकडे यांना सांगितली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. वनविभागाला या घटनेची माहिती कळवण्यात आली आहे. अंधार पडू लागल्याने ग्रामस्थ ऊसामध्ये गेले नाहीत. वनविभागाचे अधिकारी कात्रज येथे पाहणी करण्यासाठी येणार आहेत. 
दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर ग्रामस्थामध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यातच जागरुक शेतकऱ्यांनी या प्राण्याचे ठसे घेतल्याने वन खात्यासाठी देखील प्राण्याची ओळख पटण्यास मदत होणार आहे. या ठशांची तपासणी झाल्यानंतरच प्राण्याची ओळख पटून वन खाते कार्यवाही करणार आहे. वन्य प्राण्यापासून संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने वनखाते काय भूमिका घेणार या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

प्रत्यक्षदर्शीने पाहिली घटना 
आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास माझा पुतण्या घराच्याजवळ शेळ्या चारत होता. त्याने शेळीला बिबट्याने हल्ला करुन ओढत नेल्याचे सांगितले. हा प्राणी अंदाजे तीन फुट उंचीचा बिबट्या होता 
- महेश लकडे, ग्रामस्थ कात्रज ता. करमाळा 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT