Siddheshwar Express sakal
सोलापूर

सिद्धेश्वर, हसन एक्‍सप्रेसमध्ये मिळणार बेडरोल सुविधा

एक्‍सप्रेस गाड्यात वातानुकूलित बोगीत गेली दोन वर्षे बंद असलेली बेडरोल सुविधा रेल्वे बोर्डाने पुन्हा सुरू केली आहे.

विजय थोरात

एक्‍सप्रेस गाड्यात वातानुकूलित बोगीत गेली दोन वर्षे बंद असलेली बेडरोल सुविधा रेल्वे बोर्डाने पुन्हा सुरू केली आहे.

सोलापूर - एक्‍सप्रेस (Railway Express) गाड्यात वातानुकूलित बोगीत (AC Bogie) गेली दोन वर्षे बंद असलेली बेडरोल सुविधा (Bedroll Facility) रेल्वे बोर्डाने (Railway Board) पुन्हा सुरू केली आहे. प्रवासी सुविधा म्हणून रेल्वेने सोलापूर विभागातील सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्‍सप्रेस (Siddheshwar Express) आणि हसन एक्‍सप्रेसमध्ये (Hasan Express) वातानुकुलित बोगीतील प्रवाशांसाठी डिस्पोजेबल बेडशीट, कव्हर शीट, पिलो कव्हर व ब्लॅंकेट सुविधा सुविधा देण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाकडून ही सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार तब्बल दोन वर्षानंतर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. कोरोना काळात प्रवाशांना वातानुकूलित बोगीतून प्रवास करताना स्वतःहून ब्लॅंकेट डिस्पोजेबल बेडशीट आणावे लागत होते. त्यामुळे रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वातानुकूलित बोगीत दिले जाणारे डिस्पोजेबल बेडशीट, कव्हर सेट बंद करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच रेल्वे बोर्डाकडून सिध्देश्‍वर आणि हसन तसेच इतर सर्व एक्‍सप्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT