Beginning of Elgar movement of Dhangar Samaj in Western Maharashtra 
सोलापूर

धनगर समाजाच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील एल्गार आंदोलनाला सुरवात 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : धनगर समाजाच्या राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज करमाळा येथून ढोल वाजवत पश्‍चिम महाराष्ट्रातील एल्गार आंदोलनाला सुरवात करण्यात आली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात शेकडो धनगर बांधवांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणीचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना दिले. 
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे. यावेळी धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी बाबतच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, विलास पाटील, धुळा कोकरे, विठ्ठल शिंदे, डॉ. अशोक शेळके, प्रकाश कोळेकर, बाळासाहेब टकले, संदीप मारकड, दादासाहेब कोकरे, संदिप खटके, अंगद देवकते, भिवाजी शेजाळ, सतीश मोटे, विक्रांत शिंदे, अशोक घरबुडे, महादेव पोरे, चंद्रकांत शिंदे, चंद्रशेखर पाटील, मल्हारी मारकड, अंकुश शिंदे, अरूण शेळके, संतोष कोपनर, बबन शिंदे, धनंजय शिंदे, तानाजी भोंगे, सुरेश शिंदे, राहुल पाटोळे, रावसाहेब शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात तहसील कार्यालयात प्रवेश केला. 
या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्य घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणात कलम 342 मध्ये स्पष्ट तरतूद केली असताना धनगड या अस्तित्वहीन जमातीला पुढे करून 70 वर्षे झाली तरी प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी शब्दच्छल करत धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा घोर अपराध केला आहे. अनेक आश्वासने दिली गेली. परंतू अंमलबजावणीच्या नावाने बोंब केली. त्यामुळे धनगर समाजात प्रचंड असंतोष असून महाविकास आघाडी सरकारने आता वेळ न दवडता आरक्षणाची अंमलबजावणी करावी. 
आरक्षण अंमलबजावणीबरोबरच मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेची जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू करावी, मागील सरकारने जाहीर केलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून एक हजार कोटी रूपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून ध्यावा, मेंढपाळासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा बनवावा आदी मागण्या करण्यात आल्या. प्रास्ताविक बाळासाहेब टकले यांनी केले. आभार डॉ. अशोक शेळके यानी मानले. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT