Ber 
सोलापूर

वातावरण बदलाचा "गावरान मेवा'वरही परिणाम ! बहार आला कमी 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील जिरायती गावांमध्ये गोड, आंबट, तुरट गावरान बोरांची झाडे मोठ्या प्रमाणात असून, ग्रामीण भागात शेताच्या बांधांवर, विहिरीच्या कडेला तसेच आडरानावर असलेली खुरटी गावठी बोरांची झाडे दिवाळी पार पडली की गोलाकार हिरव्या बोरांनी लगडून गेली होती. पुढील पंधरा दिवसांतच डिसेंबर अखेरीस ही हिरवी असलेली बोरं लाल- पिवळसर रंग प्राप्त होताच खाण्यासाठी उपलब्ध झाली आहेत. मात्र वारंवार बदलणाऱ्या हवामानाचा फटका बोरांनाही बसत आहे. परिणामी बोराच्या झाडांना यावर्षी कमी प्रमाणात बोरं लागली आहेत. 

मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या गावरान बोरांच्या झाडांना येणाऱ्या बोरांचीही चव सर्वांना हवीहवीशी आणि न्यारी ठरत असते. यंदा मात्र गावठी बोरांचं हंगाम ऐन मकर संक्रांतीच्या तोंडावर बहरला असून, ही गावठी बोरे लहान- थोरांपासून अगदी सगळ्यांना भुरळ घालत आहेत. संक्रांतीच्या सणात वाण म्हणून गावठी बोरांना महत्त्वाचं स्थान असल्याने पुढील काही दिवसांत असलेल्या मकर संक्रांतीच्या सणामुळे या गावठी बोरांना महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे, मुंबई यांसारख्या शहरी बाजारांतून गावरान बोरांना मोठी मागणी असल्याने ही लहान आकाराची बोरे शहरी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. 

यंदा नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना रब्बी तसेच खरिपातील पिकेही हातची गेली आहेत. दुधासारखा पूरक व्यवसायही अडचणीचा ठरू लागला आहे. अशावेळी आडबाजूला आणि दुर्लक्षित राहिलेली गावरान बोरांची झाडेच आता शेतकऱ्यांच्या मदतीला येत आहेत. 

बच्चे कंपनीला अधिक काळ चाखता येणार बोराची चव 
यंदा बोरांचा हंगाम जोमात बहरला असून, गावरान बोरे हा लहानग्यांसाठी कायम कौतुकाचा विषय राहिलेला आहे. दरवर्षी शाळा सुरू असल्याने मुलांना बोरे मिळवण्यासाठी इतका वेळ मिळत नसे; मात्र यंदा ग्रामीण भागातील आठवीपर्यंतच्या शाळांना सुटी असल्याने चिमुकल्यांची पावले आपोआप बोरांच्या झाडांकडे वळताना दिसत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बच्चे कंपनीला बोरांची चव अधिक काळ चाखता येणार आहे. 

गावठी बोरांचे आहारात महत्त्व असून चवदार गावरान आंबट, गोड, तुरट चवीची बोरे खाल्ल्याने पचन लवकर होते. बोरांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आदी औषधी गुणधर्म असल्याने शरीराला बोरे खाल्ल्यामुळे फायदाच होतो. 
- डॉ. रामलिंग शेटे, 
आयुर्वेद तज्ज्ञ 

आंबट, गोड बोरं पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटते. सध्या बाजारात बोरांची आवक कमी होत असल्याने व मागणी जास्त असल्याने त्याचे दर 40 ते 50 रुपये किलो असे आहेत. 
- श्वेता शिंदे, 
कुंभेज 

वृक्षतोडीमुळे शेतीच्या बांधावर वाढणारी काटेरी गावरान बोरांची झाडे कमी होत आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात गावरान बोरं मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर चालली आहेत. 
- अर्चना पाटील, 
केत्तूर 

वारंवार बदलणाऱ्या हवामानाचा फटका बोरांनाही बसत आहे. परिणामी बोराच्या झाडांना यावर्षी कमी प्रमाणात बोरं लागली आहेत. त्यामुळे बोरांचा हंगामही लवकरच संपणार आहे. 
- ऍड. अजित विघ्ने, 
केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT