kudl sangam.jpeg 
सोलापूर

भीमा-सीना संगम प्रदूषणाच्या विळख्यात :कुडल संगम येथे धार्मिक विधीचे निर्माल्यामुळे जलप्रदूषण, प्रबोधनाची गरज 

अरविंद मोटे

सोलापूर : हत्तरसंग-कुडलसंगम येथे भीमा-सीना नदीच्या संगमावर विविध धार्मिक विधीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या ठिकाणी अस्थीविसर्जन, तेरावा विधी, यामुळे वस्त्रे, केस, निर्माल्य नदीपात्रात विसर्जित केल्याने भीमा-सीना नदीचा पवित्र संगम प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. 

हत्तरसंग-कुडलसंगम येथे भीमा आणि सीना या दोन नद्यांचा संगम आहे. हिंदू धर्मातील रितीरिवाजानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी दहावा, तेरावा, मासिक तसेच वार्षिक श्राद्धप्रसंगी पिंडदान केले जाते. हा पिंडदानाचा विधी पवित्र नदीच्या संगमस्थळावर करण्यास विशेष महत्त्व आहे. यामुळे या कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील आसपासच्या परिसरातील नागरिक याठिकाणी धार्मिक विधीसाठी मोठी गर्दी करतात. याशिवाय जन्मपत्रिकेतील विविध दोष, विविध गृहांच्या शांती व इतर अनेक दोष निवारण करण्यासाठी येथे अनेक प्रकारचे विधी केले जातात. या विधीसाठी या ठिकाणी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या विधीचे निर्माल्य नदीत विसर्जित केले जाते. मृत व्यक्तीच्या अस्थी व दहनरक्षा नदीपात्रात विसर्जित केल्या जाताता. विधी करणाऱ्या व्यक्तीचे वस्त्रे, केस व पिंडदान विधीचे निर्माल्य तसेच पूजा, शांती विधीचे निर्माल्य, फुले, उर्वरित साहित्य व अन्न नदीमध्येच विसर्जित केले जाते. यामुळे याठिकाणी दोन्ही नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नद्यांचे पाणी वाहते ठेवणे, नद्या स्वच्छ राखणे, प्रदूषण विरहित राखणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी याठिकाणी जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे. ज्या ठिकाणी विधी केला जातो, त्याच ठिकाणी स्पष्ट दिसेल, असा सूचना फलक लावणे आवश्‍यक आहे. सध्या दूरवर एक सूचना फलक दूरावस्थेत आहे. परंतु या सूचनेचे कोणीही पालन करताना दिसत नाही. पुजाऱ्यांनी यजमानांचे प्रबोधन करणे आवश्‍यक आहे. 

मंदिर समितीची जबाबदारी 

देवस्थान समितीने या ठिकाणी पूजेचे निर्माल्य विसर्जित करण्यासाठी निर्माल्य कुंड निर्मिती करणे आवश्‍यक आहे. या कुंडात साठवलेल्या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात पूजा होतात. मयताच्या अस्थी विसर्जनासह पिंडदान विधी होतात. त्या निर्माल्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन व देवस्थान समितीची आहे. मंदिर समितीने या ठिकाणी निर्माल्य कुंड ठेवण्याची व योग्य सूचना फलक लावण्याची गरज आहे. परंपरा व पर्यावरणाचा समन्वय साधण्यासाठी धार्मिक विधी नाममात्र करत पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्‍यक आहे. विसर्जित करण्यासाठी केवळ एक मूठ रक्षा वापरून इतर रक्षा शेतात टाकून झाड लावावे, जेणेकरून धार्मिक विधी होतील मात्र, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. 

भूमिका 
नदी प्रदूषणमुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. निर्माल्य, रक्षा विसर्जन, केस टाकणे, मृत व्यक्तीची आठवण नको, म्हणून त्यांचे कपडे, फोटो नदीत टाकण्यात येतात. असे प्रकार टाळल्यास नदी स्वच्छ राहिल. प्रदूषणमुक्त नदीने पर्यावरण संवर्धन होईल. 
- सहयोगी संपादक 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT